अरबाज खानचा मुलगा रवीना टंडन हिच्या मुलीला डेट? ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल अवाक्

Love Life : मलायका अरोरा - अरबाज खान यांच्या लेकाच्या आयुष्यात मुलीची एन्ट्री... रवीना टंडन हिच्या लेकीला डेट करतोय अरहान खान... व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल...

अरबाज खानचा मुलगा रवीना टंडन हिच्या मुलीला डेट? 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल अवाक्
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 8:32 AM

मुंबई | 26 जानेवारी 2024 : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. डिसेंबर महिन्यात अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं आहे. पण आता मलायका – अरबाज यांच्या खासगी आयुष्याची नाही तर, त्यांचा मुलगा अरहान खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरहान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

मलायका – अरबाज यांचा मुलगा अरहान खान अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. दोघांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरहान आणि राशा स्वतःचा चेहरा लपवताना दिसत आहेत. दोघांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अरहान आणि राशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘बापासोबत मुलाला देखील गर्लफ्रेंड भेटली..’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघे एकमेकांना डेट करत आहेत?’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरहान – राशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, अनेकदा अरहान – राशा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण कधीही दोघांनी त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. अरहान आणि राशा यांनी अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण दोघांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अरहान याला कायम आई मलायका अरोरा हिच्यासोबत स्पॉट करण्यात येतं. एवढंच नाही तर, वडिलांच्या दुसऱ्या लग्नात देखील अरहान उपस्थित होता. अरबाज खान याने रवीना हिची मेकअर आर्टिस्ट शुरा हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नात रवीना आणि राशा देखील उपस्थित होते.

राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. चाहते देखील राशाच्या पोस्ट लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.