Malaika Arora : मुलानेही सोडली मलायकाची साथ? सावत्र आईसोबत अरहानचा खास व्हिडीओ

Malaika Arora : शेवटी मलायका एकटीच राहिली? दुसरी पत्नी येताच अरबाज खानचं कुटुंब झालं पूर्ण, सावत्र आईसोबत अरहान याचा खास व्हिडीओ सर्वत्र व्हायरल... व्हायरल व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत म्हणाले...

Malaika Arora : मुलानेही सोडली मलायकाची साथ? सावत्र आईसोबत अरहानचा खास व्हिडीओ
Follow us
| Updated on: Feb 25, 2024 | 8:27 AM

मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan) याने मलायका अरोरा घटस्फोट दिल्यानंतर दुसरं लग्न शुरा खान हिच्यासोबत केलं. मोठ्या थाटात अरबाज आणि शुरा यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात मुलगा अरहान खान (Arhaan Khan) देखील उपस्थित होता. आता पुन्हा अरहान याला सावत्र आई आणि वडिलांसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अरबाज याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अरबाज खान, शुरा खान आणि अरहान खान एकत्र दिसत आहेत. अरबाज – शुरा यांनी एकमेकांचा हात पकडला आहे. तर अरहान वडील आणि सावत्र आईसोबत चालताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये पुढे अरहान गाडी चालवतो, शुरा त्याच्या बाजूला बसते आणि अरबाज मागच्या सीटवर बसलेला दिसत आहे. गाडीत बसण्याआधी अरबाज तेथील काही महिलांना पैसे देखील देताना दिसत आहे. याच दरम्यान, अरहान आणि शुरा यांच्यामध्ये असलेलं नातं देखील दिसून आलं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

काही नेटकऱ्यांनी व्हिडीओला पसंती दर्शवली, तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिघांना ट्रोल केलं. ‘अरबाज मुलगा आणि मुलीला घेऊन फिरत आहे.’ अन्य एक नेटकरी म्हणाली, ‘अरहानची गर्लफ्रेंड…’ एवढंच नाहीतर, मलायका आता एकटी पडली असं देखील नेटकरी म्हणाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त खार कुटुंबाच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

मलायकासोबत अरबाजचा घटस्फोट

एक काळ असा होता जेव्हा अरबाज आणि मलायका चाहत्यांना कपल गोल्स देत होते. 1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सतत होत असलेल्या वादामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मलायका आणि अरहान यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. घटस्फोटानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. तर दुसरीकडे अरबाद मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत होता. पण अरबाज – जॉर्जिया यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर घटस्फोटाच्या सहा वर्षांनंतर अरबाज याने मेकअप आर्टिस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. मोठ्या थाटात खान कुटुंबियांनी शुरा हिचं कुटुंबात स्वागत केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.