‘मुलांसोबत असताना तरी नीट कपडे घालावेत..’; मलायका अरोरा ट्रोल

अभिनेत्री मलायका अरोराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तिचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुलांसोबत असताना तरी अंगभर कपडे घालावेत, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.

'मुलांसोबत असताना तरी नीट कपडे घालावेत..'; मलायका अरोरा ट्रोल
Malaika Arora Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 3:24 PM

अमेरिकन इन्फ्लुएन्सर आणि प्रोफेशनल रेसलर लोगन पॉल, अमेरिकन युट्यूबर मिस्टर बीस्ट नुकतेच मुंबईत आले होते. यासाठी मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला करीना कपूर खान, सैफ अली खान, शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुख त्यांच्या मुलांसह पोहोचले होते. यावेळी अभिनेत्री मलायका अरोरासुद्धा तिचा मुलगा अरहान खानसह उपस्थित होती. या कार्यक्रमातील मलायकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला तिच्या कपड्यांवरून नेटकरी ट्रोल करत आहेत. मुलासोबत येताना तरी किमान कपड्यांचा नीट विचार करावा, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

या कार्यक्रमात मलायकाने डेनिम को-ऑर्ड सेट परिधान केला होता. पांढऱ्या ब्रालेटवर डेनिम जॅकेट आणि त्याखाली लूज पँट असा तिचा लूक होता. मलायकाचा व्हिडीओ पापाराझी अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. कार्यक्रमाला पोहोचल्यानंतर मलायका तिच्या मुलासह एका जागी बसते. यावेळी ती जाणूनबुजून अंगप्रदर्शन करत असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. ‘मुलांसोबत असताना तरी किमान चांगले कपडे परिधान करावेत’, असं एकाने म्हटलंय. तर ‘लहान मुलं असताना ती इतकं अंगप्रदर्शन का करतेय’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. अभिनेता अर्जुन कपूरने ‘सिंघम अगेन’च्या प्रमोशनदरम्यान सिंगल असल्याचं जाहीर करताच मलायकाने सोशल मीडियावर शेअर केलेले पोस्ट प्रकाशझोतात आले होते. मलायकाने नोव्हेंबर महिना सुरू होताच ”नो’व्हेंबर.. तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या लोकांना, ठिकाणांना आणि गोष्टींना नाही म्हणण्याची वेळ आली आहे,’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर तिने नोव्हेंबर महिन्यातील ‘चॅलेंज’ची यादी टाकली होती.

मलायका आणि अर्जुन गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या आहेत. ब्रेकअपच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर अनेकदा अर्जुन आणि मलायका हे सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे पोस्ट लिहित होते. मात्र दिवाळीत पहिल्यांदाच अर्जुनने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. अर्जुन मुंबईतील एका दिवाळी पार्टीत पोहोचला होता. राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या या दिवाळी पार्टीत तो ‘सिंघम अगेन’मधील अजय देवगण, टायगर श्रॉफ, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांसारख्या कलाकारांसोबत पोहोचला होता. यावेळी गर्दीतून चाहत्यांनी जेव्हा मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुनने ‘मी सिंगल आहे’ असं स्पष्ट केलं होतं.

'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.