अर्जुन कपूर याला हे काम करताना पाहून मलायका अरोरा हिच्या तोंडातून निघाले चक्क हे शब्द, थेट…
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. मलायका अरोरा हिचा नुकताच वाढदिवस हा पार पडलाय.
मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे गेल्या काही दिवसांपासून सतत त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. अर्जुन कपूर याला नेहमीच सपोर्ट करताना मलायका अरोरा ही दिसते. नुकताच मलायका अरोरा हिने काही अत्यंत खास असे व्हिडीओ हे इंस्टा स्टोरीवर शेअर केले. या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हा रॅम्प वॉक करताना दिसतोय. अर्जुन कपूर या जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. अर्जुन कपूर याच्या लूकवर मलायका देखील फिदा झालीये.
अर्जुन कपूर याच्या व्हिडीओ शेअर करत मलायका अरोरा हिने लिहिले की, फ्फफफ काय स्माईल आहे. हॉटस्टेपर. दुसरा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, जस्ट लुकिंग लाईक ए वॉओ…विशेष म्हणजे या कार्यक्रमात अर्जुन कपूर याला सपोर्ट करण्यासाठी मलायका देखील पोहचली. आता मलायका हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय.
कायमच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसले. यावेळी विदेशात रस्त्यावर फिरताना देखील मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दिसले. एक चर्चा रंगली की, मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई होणार आहे.
या चर्चांवर अर्जुन कपूर याने थेट संताप व्यक्त करत तो चांगलाच भडकलेला दिसला. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याची देखील चर्चा काही दिवसांपूर्वीच सुरू होती. मात्र, त्यानंतर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे मुंबईमध्ये स्पाॅट झाले. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या रिलेशनमुळे नेहमीच चर्चेत असतात.
मलायका अरोरा हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिच्या पायाला मोठी जखम झाल्याचे बघायला मिळाले. मलायका अरोरा ही जखम देखील चक्क लपवताना दिसली. मलायका अरोरा हिच्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तिचे चाहते हे चांगलेच टेन्शनमध्ये आल्याचे बघायला मिळाले.