दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हॉट मलायकाने काय खाल्लं?; तुमच्याही तोंडाला पानी सुटेल
मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका अरोरा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मलायका अरोरा ही अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून अर्जुन कपूर याला डेट करत आहेत. नेहमीच अर्जुन कपूरसोबतचे फोटो शेअर करताना मलायका अरोरा ही दिसते.
मुंबई : मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट होऊन आता बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, अनेकदा हे दोघे एकसोबत स्पाॅट होताना दिसतात. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा एक लेक असून त्याचे नाव अरहान खान आहे. नुकताच आता अरबाज खान हा दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला आहे. मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असते. मलायका अरोरा ही अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, यांनी त्यांच्या लग्नाबाबत कधीच काही भाष्य केले नाहीये.
विशेष म्हणजे कायमच मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसते. प्रत्येक अपडेट मलायका अरोरा ही सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच आता मलायका अरोरा हिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमुळेच आता मलायका अरोरा ही तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.
मलायका अरोरा हिची ही पोस्ट पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी आल्याचे बघायला मिळतंय. मलायका अरोरा हिने पोस्ट केलेल्या फोटोमध्येमध्ये दोन डब्बे दिसत आहेत. एका डब्यामध्ये गाजराचा हलवा आणि दुसऱ्या डब्यामध्ये मस्तपैकी तिळ आणि गुळाच्या वड्या या दिसत आहेत. विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने हा दिल्लीमधील फोटो शेअर केलाय.
मलायका अरोरा ही नुकताच दिल्लीतील एका हाॅटेलमध्ये पोहचली. यावेळी हा गाजरचा हलवा आणि तिळ आणि गुळाच्या वड्यांनी तिचे स्वागत करण्यात आले. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हे मिळाल्याने मलायका अरोरा ही चांगलेच खुश झाल्याचे या पोस्टमधून स्पष्टपणे दिसत आहे. आता मलायका अरोरा हिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
मध्यंतरी एक चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या पोस्टवरून हे स्पष्ट झालंय की, ही फक्त अफवाच होती. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे विदेशात धमाल करताना दिसले. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिच्यासोबतचे अत्यंत खास असे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.