Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे.

Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर
Ali Akbar
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 8:15 AM

कोची: मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अली अकबर (Ali Akbar) यांनी मुस्लीम (Muslim) धर्माचा त्याग करत असल्याची घोषणा केली आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी स्माईली इमोजीज सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. या कृत्यामुळं व्यथित होऊन अली अकबर आणि त्यांची पत्नी ल्युसायमा यांनी मुस्लीम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार असल्याचं म्हटलं आहे. अली अकबर यांचं नवं नाव राम सिंग असणार आहे, असं वृत्त ऑप इंडिया वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे.

मुस्लीम नेत्यांवरही नाराजी

अकबर अली यांनी मुस्लीम धर्मातील वरिष्ठ नेत्यांनी देखील अशा कृत्यांचा निषेध नोंदवलेला नाही. भारतीय संरक्षण दलाच्या शौर्यवान आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासंदर्भातील अशा प्रतिक्रिया स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत, असं अली अकबर म्हणाले. अली अकबर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भातील घोषणा केली आहे.

आज मी मला जन्मापासून मिळालेली ओळख फेकून देत आहे. आज पासून मी मुस्लीम नसून मी भारतीय आहे. भारताविरोधात स्माईली पोस्ट करणाऱ्या हजारो लोकांविरोधातील ही माझी प्रतिक्रिया असल्याचं अली अकबर म्हणाले आहे. अली अकबर यांनी देखील कमेंटसला प्रत्युत्तर देताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. त्यानंतर ती पोस्ट फेसबुकवरुन हटवली गेली मात्र ती व्हाटसअपवरुन शेअर करण्यात आली आहे.

इमोजी पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी

देशानं सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी पोस्ट देखील केली आहे. या पोस्टवर देखील सोशल मीडियावर दोन गट पडलेले दिसून आले, काही जणांनी अली अकबरचं समर्थन केलं, तर काही जणांनी त्याच्या विरोधात कमेंट केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी

धर्मांतर करण्याच्या शासकीय प्रक्रिया पूर्ण करुन पत्नीसह हिंदू धर्मात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य अली अकबर यांनी केलं आहे. मात्र, दोन्ही मुलींना धर्मांतर करण्यासाठी सक्ती करणार नसून त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा असल्याचंही अली अकबर म्हणाले. अली अकबर भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे होते. मात्र, पक्ष नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला होता.

इतर बातम्या:

आम्हीही आंतरजातीय विवाह केला, तरीही तू स्वीकारलंस! मग कीर्तीच्या आईला का नाही जमलं?, अभिनेत्रीची पोस्ट होतेय व्हायरल!

Urfi Javed | निळ्या बिकिनीमध्ये उर्फी जावेदने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटो पाहून चाहते म्हणतायत…

Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल…’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!

Malayalam Director Ali Akbar quits Muslim and announce new name Ram Singh protest against smiley emoticons

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.