प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात; कारची पिकअप व्हॅनला धडक आणि…

सिनेविश्वातील धक्कादायक बातमी...,प्रसिद्ध अभिनेत्याच्या अपघातामुळे सर्वत्र खळबळ, चाहत्यांकडून चिंता व्यक्त; कशी आहे अभिनेत्याची प्रकृती? सर्वत्र अभिनेत्याच्या अपघाताची चर्चा

प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात; कारची पिकअप व्हॅनला धडक आणि...
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 1:30 PM

मुंबई : 5 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिनेविश्वातून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. सेलिब्रिटींचं निधन, काही सिलेब्रिटींनी स्वतःला संपवण्याचा घेतलेला निर्णय इत्यादी धक्कादायक प्रकरणांमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अशात आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या कारचा अपघात झाला आहे. ज्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. आता ज्या अभिनेता – दिग्दर्शकाच्या कारला अपघात झाला आहे, तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आणि दिग्दर्शक जॉय मॅथ्यू यांच्या कारला अपघात झाला आहे.

जॉय मॅथ्यू मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जॉय मॅथ्यू यांच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर चाहते त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अशात मिळत असलेल्या माहितीनुसार जॉय मॅथ्यू जखमी झाले आहे. पण त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं देखील समोर येत आहे.

सोमवारी रात्री केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात महामार्गावर जॉय मॅथ्यू यांच्या कारचा अपघात झाला. रात्री जॉय मॅथ्यू यांच्या कारने पिकअप व्हॅनल धडक दिली. या अपघातात जॉय मॅथ्यू आणि त्यांचे ड्रायव्हर जखमी झाले आहेत. सध्या चाहते आणि कुटुंबिय त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. या अपघाताबद्दल पोलिसांनी देखील मोठी माहिती दिली आहे.

पोलीस म्हणाले, ‘जॉय मॅथ्यू यांचा ड्रायव्हर कार चालवत होता. तेव्हा झालेल्या अपघातात जॉय मॅथ्यू यांच्या नाकाला दुखापत झाली. तेव्हा स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा जीव वाचवण्यात आला..’ तर व्हॅनचा ड्रायव्हर देखील जखमी झाला आहे. व्हानचा ड्रायव्हर व्हॅनमध्ये अडकला होता. अग्निशमन विभाग स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आलं…

जॉय मॅथ्यू यांनी अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. पण अनेक गोष्टीमुळे दिग्दर्शक चर्चेत आले. दरम्यान सरकारविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे जॉय मॅथ्यू चर्चेत आले होते. जॉय मॅथ्यू यांनी अनेक सिनेमांमध्ये अभिनेता म्हणून भूमिका साकरली आहे. तर अनेक सिनेमांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील जॉय मॅथ्यू यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता त्यांचा अपघात झाल्यामुळे चाहते चिंतेत आहेत.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.