Mamata banerjee | ममता बनर्जी यांची अत्यंत मोठी मागणी, अमिताभ बच्चन यांच्यासोबत तब्बल दीड तास बैठक आणि थेट
ममता बनर्जी या सध्या मुंबईमध्ये आहेत. विशेष म्हणजे नुकताच ममता बनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेतलीये. ममता बनर्जी या मुंबईमध्ये एका बैठकीसाठी आल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या जलवा बंगल्यावर अनेक घडामोडी घडताना दिसल्या. ममता बनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना राखी बांधली आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सध्या जोरदार चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या घरी मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा बंगल्यावर पोहचल्या. यावेळी अमिताभ बच्चन यांना ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांनी राखी बांधल्याचे देखील सांगितले जात आहे. या बैठकीला राजकिय स्वरूप देखील प्राप्त झाले आहे. ममता बनर्जी या पुढील दोन दिवस मुंबईमध्ये असणार असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे थेट विमानतळावरून ममता बनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांचे घर गाठले. ममता बनर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये तब्बल दीड तास गुप्त बैठक पार पडल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीमध्ये राजकिय चर्चा झालीये. अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच ममता बनर्जी यांना आपल्या घरी चहाचे निमंत्रण दिले होते. विशेष बाब म्हणजे ते निमंत्रण स्वीकारत अमिताभ बच्चन यांच्या घरी ममता बनर्जी या पोहचल्या.
अमिताभ बच्चन यांच्या घरून निघताना ममता बनर्जी या माध्यमांसोबत बोलताना दिसल्या. ममता बनर्जी यांनी यावेळी अत्यंत मोठी मागणी केलीये. ममता बनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मोठी मागणीच करून टाकली आहे. यापूर्वीही ममता बनर्जी यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असे म्हटले होते.
ममता बनर्जी या म्हणाल्या की, अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्यायला हवे, माझ्या हातात असते तर मी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न दिला असता. इतकेच नाही तर ममता बनर्जी यांनी बच्चन यांच्या कुटुंबाला दुर्गापूजेसाठी आमंत्रित केले आहे. अमिताभ बच्चन आणि ममता बनर्जी यांच्यामध्ये जवळपास एक ते दीड तास चर्चा झालीये.
अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन हे चक्क एका चाहत्याच्या गाडीवर बसून मुंबईमध्ये फिरताना दिसले होते. मात्र, या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी हेल्मेट घातले नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांना दंड आकारला होता.
अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे देखील सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो, व्हिडीओ आणि कविता शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे.