‘मन उडु उडु झालं’ फेम अजिंक्य राऊत चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला; ‘सरी’मध्ये दिसणार प्रेमाचा त्रिकोण

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडु उडु झालं' या मालिकेतून अजिंक्य घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली.

'मन उडु उडु झालं' फेम अजिंक्य राऊत चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला; 'सरी'मध्ये दिसणार प्रेमाचा त्रिकोण
SariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 2:18 PM

मुंबई : प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित प्रेमकथा ‘सरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या पोस्टरवर ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अजिंक्य राऊत, विविध चित्रपटांतून तरुणांच्या हृदयाचा ठाव घेणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पृथ्वी अंबर यांच्या प्रेमाचा त्रिकोण पहायला मिळत आहे. आता त्यांचं हे प्रेम त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइज अँड मिरॅकल्स’ अशी या प्रेमकथेची टॅगलाईन आहे.

कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचं लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केलं आहे. सरी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ते मराठीत पदार्पण करत आहेत. तर रिलायन्स एंटरटेनमेंटने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळली आहे.

हे सुद्धा वाचा

‘सरी’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात; “गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी पाहिली आहे. मी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा होती. ती संधी मला ‘सरी’ या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना ही प्रेमकथा नक्कीच आवडेल.”

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ या मालिकेतून अजिंक्य घराघरात पोहोचला. यामध्ये त्याने अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली. आता अजिंक्यला मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असेल.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.