मुंबई : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कायम त्यांच्या वक्तव्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. ९० च्या दशकात आपल्या घायाळ अदांनी आणि भन्नाट अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मनिषा कोईराला पुन्हा तिच्या एका वक्यव्यामुळे चर्चेत आली आहे. खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक चढ-उतार पाहणारी मनिषा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. याच दरम्यान कर्करोगाला मात देणाऱ्या मनिषाने बॉलिवूडबद्दल मोठा खुलासा केला आहे.
यावेळी मनिषा कोईरालाने बॉलिवूडमध्ये वयाच्या अंतरावरून होत असलेल्या भेदभावाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये लोक भेदभाव तर करतातच…’ एका मुलाखतीत अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये होत असलेल्या भेदभावाबद्दल वक्तव्य केलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘लोक तुमचा सतत अपमान करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर म्हणतात, तुम्ही आता वृद्ध झाले आहात. वयानुसार पुढे जाणे स्वाभावीक आहे. यामुळे भेदभाव होणं फार वाईट आहे. अभिनेत्री दिसायला सुंदर आसावी, तरुण असावी अशी लोकांची समज आहे.’ असं वक्तव्य करत अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये होणाऱ्या वक्तव्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं.
मनिषाला फक्त प्रोफशनल आयुष्यामुळेच नाही, तर खासगी आयुष्यामुळे देखील अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. मनिषा १२ जणांसोबत रिलेशनशिपमध्ये होती असं अनेकदा समोर आलं. अखेर मनिषाने उद्योगपती सम्राट दहालसोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
महत्त्वाचं म्हणजे आज सर्वकाही असून अभिनेत्री एकटी आयुष्य जगते. खासगी आयुष्याबद्दल देखील अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. ‘माझ्या नशिबातच प्रेम नाही…मी हे सत्य स्वीकारलंय!’ असं वक्तव्य अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलं होतं.
मनिषाचे आगामी सिनेमे
मनिषा लवकरच अभिनेता कार्तिक आर्यन स्टारर ‘शहजादा’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर कम बॅक करणार आहे. ‘शहजादा’ सिनेमासोबतच अभिनेत्री दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.