माझ्या आयुष्यात पुरुषांचं प्रेम…, 12 अफेअर, अपयशी लग्न, 53 व्या वर्षी अभिनेत्रीकडून खंत व्यक्त

Love Life: एक दोन नाहीतर, 12 सेलिब्रिटींनी केलं अभिनेत्रीवर प्रेम, पण लग्नापर्यंत नाही पोहोचलं नातं, दोन वर्षात मोडलं लग्न, वयाच्या 53 व्या वर्षी अभिनेत्री म्हणते, 'माझ्या आयुष्यात पुरुषांचं प्रेम... ', आज गडगंज पैसा, प्रसिद्धी असून देखील अभिनेत्री एकटीच...

माझ्या आयुष्यात पुरुषांचं प्रेम..., 12 अफेअर, अपयशी लग्न, 53 व्या वर्षी अभिनेत्रीकडून खंत व्यक्त
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 2:31 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. शिवाय लग्नानंतर देखील अभिनेत्रीला सुखी संसाराचा आनंद घेता आला नाही. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मनिषा कोईराला. मनिषा कोईराला हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं, पण अभिनेत्रीला खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला. अभिनेत्रीने 12 सेलिब्रिटींना डेट केलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.

12 वेळा ब्रेकअप झाल्यानंतर मनिषा हिने नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. 19 जून 2010 साली त्यांनी लग्न केलं. पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघांच्या नात्यात वादाची ठिणगी पेटू लागली.. अशात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2012 रोजी मनिषा आणि सम्राट यांचं ब्रेकअप झालं.

दरम्यान एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझ्या आयुष्यात पुरुषाचं प्रेमच नाही…’ दुःख व्यक्त करत मनिषा म्हणाली होती, ‘लग्नाच्या सहा महिन्यांनंतर पतीच माझा शत्रू झाला. एका महिलेसाठी यापेक्षा वाईट काय असू शकतं…’

हे सुद्धा वाचा

‘मी पुन्हा दुसऱ्या कोणाला मला निराश करण्याची परवानगी देणार नाही… . चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही योग्य असं देखील मनिषा म्हणाली होती. सांगायचं झालं तर, मनिषा कोईराला बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्रल कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्यामाध्यमातून अभिनेत्री चाहत्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय आजही मनिषाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

मनिषा कोईराला हिचे बॉयफ्रेंड…

मनिषाचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत देखील मनिषा हिचं नाव जोडण्यात आलं.. नाना पाटेकर यांच्याशिवाय मनिषाचं नाव विवेक मुशरान, डिजे हुसैन, सेसिल एंथनी , आर्यन वेद, प्रशांत चौधरी, क्रिस्पिन कॉनरॉय, तारिक प्रेमजी, राजीव मूलचंदानी क्रिस्टोफर डोरिस यांच्यासोबत जोडण्यात आलं..

मनिषा कोईराला हिचे सिनेमे

मनिषाने 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमामध्ये अभिनेत्री झळकली. ‘ मन’ सिनेमामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. ‘1942: ए लव स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अग्नि साक्षी’, ‘गुप्त’ आणि ‘मन’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री मनीषा कोईराला हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘हीरामंडी’ सीरिजमुळे अभिनेत्री चर्चेत आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.