नाना पाटेकरांपासून ऑस्ट्रेलियन राजदूतापर्यंत… मनिषा कोईरालाचे प्रेमसंबंध, म्हणाली, ‘चुकीच्या पुरुषांसोबत…’

Manisha Koirala: 'चुकीच्या पुरुषांकडे आकर्षित व्हायचे आणि...', मनिषा कोईरालाचं खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य, नाना पाटेकरांपासून ऑस्ट्रेलियन राजदूतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना अभिनेत्रीने केलंय डेट... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या रिलेशनशिपची चर्चा...

नाना पाटेकरांपासून ऑस्ट्रेलियन राजदूतापर्यंत... मनिषा कोईरालाचे प्रेमसंबंध, म्हणाली, 'चुकीच्या पुरुषांसोबत...'
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 12:01 PM

अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आज मनिषा हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मनिषा कोईराला हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने नेपाळी सिनेविश्वातून करियरला सुरुवात केली. 1989 मध्ये अभिनेत्री करियरला सुरुवात केली. मनिषा हिच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘फेरी भेटुला’ असं होतं. त्यानंतर अभिनेत्री काही वर्षात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ सिनेमात अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारली होती. सिनेमात मनिषा हिने राजकुमार आणि दिलीप कुमार यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींसोबत काम केलं.

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

बॉलिवूडमध्ये संधी मिळाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक हीट सिनेमे मनिषा हिने बॉलिवूडला दिले. पण बॉलिवूडमध्ये काम करत असताना मनिषा हिच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत रंगू लागली. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यापासून ऑस्ट्रेलियन राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय यांच्यासोबत देखील मनिषा रिलेशनशिपमध्ये होती.

मनिषा कोईराला हिच्या नावाची चर्चा एक दोन नाही तर, तब्बल 12 सेलिब्रिटींसोबत रंगली. पण कोणासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने 2010 मध्ये नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे 2012 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली.

तब्बल 12 सेलिब्रिटींसोबत रिलेशनशिप आणि उद्योजकासोबत झालेल्या घटस्फोटानंतर मनिषा हिने कधील लग्न करण्याचा निर्णय केला आहे. आज वयाच्या 54 व्या वर्षी देखील मनिषा एकटीच आयुष्य जगत आहे. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्री खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी गेल्या 5-6 वर्षांपासून एकटी जगत आहे आणि आता मी कोणासोबत राहाण्याच्या मनस्थितीत नाही. मला अजून स्वतःवर काम करायचं आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे आणि ती म्हणजे मी फक्त चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात का पडली? मी विचार करायची माझ्याकडून सतत असं का होत आहे? मी फक्त त्रास देणाऱ्या पुरुषांकडे आकर्षित होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.