‘माझ्या नशिबातच पुरुषाचं प्रेमच नाही…’, लग्नानंतर सहा महिन्यात अभिनेत्रीचे पतीसोबत वाद
लग्नाच्या सहा महिन्यानंतर पतीसोबत वाद सुरु झाल्यानंतर अभिनेत्रीने फेसबूवर लिहिलेली पोस्ट आजही चर्चेत; संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही असून 'ती' आजही एकटीच
मुंबई : आपल्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही सुरळीत असावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. आपलं खासगी आयुष्य आनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण अनेकांना खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा संघर्ष करावा लागतो. ‘मन’, ‘दिल से’, ‘बॉम्बे’, ‘अकेले हम अकेले तुम’ अशा अनेक सिनेमांतून चाहत्यांच मनोरंजन करणारी अभिनत्री मनिषा कोईराला (manisha koirala) हिच्याकडे आज संपत्ती, प्रसिद्ध सर्व काही असून देखील अभिनेत्री एकटी आयुष्य जगते. मनिषा कोईराला हिने 19 जून 2010 उद्योगपती सम्राट दहल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न अधिक काळ टिकू शकलेलं नाही. (manisha koirala boyfriend)
लग्नाच्या काही महिन्यानंतर मनिषाचे पती सम्राट दहल यांच्यासोबत वाद होवू लागले. मनिषा आणि सम्राट दहल यांचं लग्न फक्त दोन वर्ष टिकलं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर अभिनेत्रीने फेसबूकवर एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्ट आजही तुफान चर्चेत आसते. (manisha koirala husband)
अभिनेत्रीने फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, अभिनेत्रीचा सर्वात मोठा शत्रू तिचा पती आहे. ज्याच्यासोबत मनिषाला राहायचं नव्हतं. लग्नानंतर दोन महिन्यात त्यांच्यातील मतभेद इतके वाढले की मनिषा आणि सम्राट दहल यांनी दोघांनी तात्काळ विभक्त होण्याचा निर्णय घेतला. शिवाय मनिषाने एक मुलाखतीत घटस्फोटासाठी ती स्वतः जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतर मनिषाने ‘माझ्या नशिबातच पुरुषाचं प्रेमच नाही आणि हे सत्य मी आता स्वीकारलं आहे.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. ‘मला पुन्हा निराश करण्याची परवानगी मी कोणाला देणार नही. चुकीच्या नात्यात अडकण्यापेक्षा एकटं राहणं केव्हाही योग्य असं देखील मनिषा म्हणाली.
पुढे मनिषा म्हणाली, ‘मी आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे, ज्याठिकाणी मी चुकीचं पाऊल टाकू शकत नाही. परमेश्वराने मला नवी संधी दिली आहे. एक वेळ अशी होती, जेव्हा माझं आयुष्य पूर्ण वेगळं झालं होतं. पण प्रत्येक नव्या संघर्षाने मला एक नवी संधी दिली आहे. तुम्ही जेव्हा मोठ्या अडचणीत असता, तेव्हा, तुम्हाला खऱ्या आयुष्याचा अर्थ कळतो.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
घटस्फोटानंतर मनिषा कोईराला हिला कर्करोग झाल्याचं कळालं. कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर अभिनेत्रीची प्रकृती आता स्थिर आहे. मनिषा कोईराला बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर मात्रल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिआवर शेअर करत असते.