मनिषा कोईरालाकडून आई होऊ न शकल्याचं दु:ख व्यक्त; सांगितलं मूल दत्तक न घेण्यामागचं कारण

2012 मध्ये मनिषाला गर्भाशयाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यावर तिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले आणि 2014 मध्ये ती कॅन्सरमुक्त झाली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मनिषाने अभिनयक्षेत्रात पुनरागमन केलं. सध्या 'हिरामंडी'मधील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

मनिषा कोईरालाकडून आई होऊ न शकल्याचं दु:ख व्यक्त; सांगितलं मूल दत्तक न घेण्यामागचं कारण
Manisha Koirala Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 12, 2024 | 12:33 PM

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री मनिषा कोईरालाने दमदार भूमिका साकारली. मनिषाने या सीरिजमध्ये आईची भूमिका साकारली असली तरी तिच्या भूमिकेला थोडीशी नकारात्मक छटा आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनिषा खऱ्या आयुष्यात आई होण्याच्या इच्छेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “मी खऱ्या आयुष्यात आई होऊ शकत नाही, या गोष्टीला मी आता स्वीकारलं आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे”, असं ती म्हणाली. मनिषाला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. त्यावर तिने यशस्वीरित्या मात दिली.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या आयुष्यात काही पूर्णत्वास न गेलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जसजसे मोठे होता, तसतसं रिअॅलिटीला स्वीकारता. अशी अनेक स्वप्नं असतात, ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत हे तुम्हाला माहित असतं. त्यामुळे ती गोष्ट किंवा परिस्थिती तुम्ही आहे तशी स्वीकारता. माझ्यासाठी मातृत्त्व ही गोष्ट त्यापैकीच एक आहे. गर्भाशयाचा कर्करोग आणि त्यानंतर आई न होऊ शकणं या गोष्टींचा स्वीकार करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण आता मी ती परिस्थिती स्विकारली आहे आणि त्यातच समाधान मानलं आहे. जे गेलं ते गेलं. आता माझ्या हातात जे आहे, त्यातून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

या मुलाखतीत मनिषाला मूल दत्तक घेण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी तिने पुढे सांगितलं, “मी दत्तक घेण्याविषयी खूप विचार केला. पण नंतर मला जाणवलं की मी छोट्या छोट्या गोष्टींचा खूप ताण घेते. मला लगेच टेन्शन येतं. त्यामुळे बऱ्याच चर्चेनंतर मी मूल दत्तक न घेण्याचा निर्णय घेतला. त्यापेक्षा मी गॉडमदर होईन. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्यातच मी समाधान मानलं आहे. माझे वृद्ध आईवडील माझ्यासोबत आहेत. त्यांच्यावर मी खूप प्रेम करते. त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबत राहीन आणि त्यांची काळजी घेईन. नेपाळला जाऊन मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवते.”

‘हिरामंडी’ ही सीरिज प्रदर्शित होण्याआधी मनिषाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. ‘माझ्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या करिअरमध्ये मला उल्लेखनीय भूमिका साकारायला मिळाल्या, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि अवघड काळात मैत्रीने खूप साथ दिली. देवाच्या कृपेने मला कॅन्सरनंतर जणू दुसरा जन्मच मिळाला आहे. माझ्या आयुष्यात मी काही कठीण प्रसंगही पाहिले आहेत. आता मला वेळेचं महत्त्व खूप जाणवू लागलं आहे’, असं तिने लिहिलं होतं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.