पार्टीत वोडका पिणाऱ्या मनिषा कोईरालावर आलेला ‘तो’ प्रसंग, अभिनेत्रीची आई म्हणाली…

Manisha Koirala: मनिषा कोईराला दारु पिण्याची सवय पडली होती महागात..., वोडका पित असताना अभिनेत्रीवर आला असा प्रसंग, मनिषाच्या आई म्हणाल्या होत्या..., मनिषा कोईराला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत... सध्या सर्वत्र चर्चांना उधाण...

पार्टीत वोडका पिणाऱ्या मनिषा कोईरालावर आलेला 'तो' प्रसंग, अभिनेत्रीची आई म्हणाली...
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 9:27 AM

अभिनेत्री मनिषा कोईराला कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली मनिषा ‘हीरामंडी’ सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. नुकताच झालेल्या मुलाखतीत मनिषा हिने जुन्या आठवणी ताज्या केल्या. एका पार्टीमधील किस्सा अभिनेत्रीने सांगितला. इंडस्ट्रीमधील अभिनेत्रींबद्दल लोकं काय विचार करायचे, तेव्हा कसा भेदभाव आणि लिंगभेद व्हायचा यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

मनिषा हिने जेव्हा पहिल्या सिनेमात काम केलं होतं. शुटिंग पूर्ण झाल्यानंतर पार्टीचं आयोजन केलं होते. तेव्हा वोडका पित असलेल्या मनिषा हिच्यावर कोणता प्रसंग ओढावला होता… यावर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र मनिषा हिची चर्चा रंगली आहे.

मनिशा कोईराला म्हणाली, ‘सौदागर सिनेमाची पार्टी होती. मी वोडका पित होती. तेव्हा आजू-बाजूच्या लोकांमध्ये कुजबूज सुरू होती, ही बघा वोडका पिते… ती कोकमध्ये वोडका मिक्स करून पित आहे. तेव्हा काही लोकांनी सल्ला दिला कोणाला सांगू नका मनिषा वोडका पित आहे. कारण तेव्हा अभिनेत्रींनी वोडका पिणं योग्य मानलं जात नव्हतं…’

हे सुद्धा वाचा

‘मला देखील सांगण्यात आलं होतं की, कोक पित आहे असं सांग… माझ्यासाठी सर्वकाही नवीन होतं. घरी आल्यानंतर आईला मी सांगितलं.. तेव्हा मला माझ्या आईने सांगितलं, तू वोडका पित आहेस तर, वोडका पित आहे असंच सांग. अशा लहान गोष्टींसाठी खोट बोलायची गरज नाही.’

पुढे मनिषा म्हणाली ‘गोष्टी गुपित का ठेवायच्या, हे लॉजिक मला कळंत. म्हणून मी कोणाला डेट करत असेल तर, मी त्या गोष्टीचा स्वीकार करायची. जर मी कोणाला डेट करत आहे, तर मी करत आहे… त्या गोष्टीसाठी तुम्हाला मला जज करायचं असेल तर करा आणि पुढे जा… मी माझ्या अटींवर आयुष्य जगते…’

लिंगभेदावर देखील अभिनेत्रीने सोडलं मौन

इंडस्ट्रीमध्ये तेव्हा लिंगभेद होता. अभिनेत्री, अभिनेत्यामध्ये भेदभाव केला जायचा… तेव्हा अनेक गर्लफ्रेंड असणाऱ्या अभिनेत्याला माचो समजलं जायचं. पण अभिनेत्री कोणाला डेट करत असेल तर, तिच्यावर टीका केली जायची. अभिनेत्याकडे अनेक गर्लफ्रेंड्स सामान्य गोष्ट होती. पण अभिनेत्रींना नाही… नाही… आम्हाला कोणी स्पर्श केलेला नाही… असं राहावं लागत होतं…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.