मनारा चोप्रा हिला तहलकाने दिले अत्यंत महागडे गिफ्ट, तब्बल इतके लाख आणि..

बिग बॉस 17 चा काही दिवसांपूर्वीच फिनाले पार पडला. विशेष म्हणजे या सीजनने मोठा धमाका केला. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. आता बिग बॉस 17 चा फिनाले जरी झाला असला तरीही सर्व स्पर्धेक हे चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय.

मनारा चोप्रा हिला तहलकाने दिले अत्यंत महागडे गिफ्ट, तब्बल इतके लाख आणि..
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 1:59 PM

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात जोरदार धमाका करताना स्पर्धेक दिसले. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 17 चा फिनाले हा पार पडला. बिग बॉस 17 ला शेवटपर्यंत टीआरपीमध्ये म्हणावी तशी धमाल करता नाही आली. मात्र, प्रेक्षकांमध्ये बिग बॉस 17 बद्दल एक क्रेझ ही नक्कीच बघायला मिळाली. बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारूकी हा झालाय. बिग बॉस 17 चा विजेता झाल्यापासून मुनव्वर फारूकी हा चांगलाच चर्चेत दिसतोय. मुनव्वर फारूकी हा सतत मुलाखती देताना देखील दिसतोय. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत सहभागी झाली.

बिग बॉस 17 चे अनेक स्पर्धेक हे खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मनारा चोप्रा ही देखील बिग बॉस 17 मधून बाहेर पडल्यापासून चांगलीच चर्चेत आलीये. मनारा चोप्रा हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली आणि सांगितले की, बिग बॉस 17 च्या बाहेर आल्यानंतर प्रियांका चोप्राने कशाप्रकारे आपले काैतुक केले.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. हा व्हायरल होणारा व्हिडीओ मनारा चोप्रा हिचा आहे. या व्हिडीओमध्ये मनारा चोप्रा हिच्यासोबत तहलका भाई देखील दिसतोय. हेच नाही तर बिग बॉस 17 च्या घरात देखील मनारा चोप्रा आणि तहलका यांच्यामध्ये खास रिलेशन दिसले. आता तिच मैत्री ही घराच्या बाहेर देखील बघायला मिळतंय.

तहलका याने मनारा चोप्रा हिला एक अत्यंत खास आणि महागडे असे गिफ्ट दिले आहे. याचाच व्हिडीओ मनारा चोप्रा हिने शेअर केल्याचे बघायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये मनारा चोप्रा आणि तहलका हे धमाल करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. मनारा चोप्रा आणि तहलका यांना मस्ती करताना पाहून चाहते देखील आनंदी झाल्याचे बघायला मिळतंय.

मनारा चोप्रा हिला तहलका याने तब्बल 40 लाखांची सोन्याची चेन ही गिफ्ट दिलीये. विशेष म्हणजे व्हायरस होणाऱ्या व्हिडीओमध्ये मनारा चोप्रा हिच्या गळ्यामध्ये ती चेन देखील दिसत आहे. तहलका याने मनारा चोप्रा हिला तब्बल 40 लाखांची चेन गिफ्ट दिल्याने मोठे आश्वर्य हे व्यक्त केले जात आहे. मनारा चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघालयला मिळते.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.