अंकिता लोखंडे हिने केली हद्दपार, थेट मनारा चोप्रासोबत केले ‘हे’ कृत्य, हैराण करणारा प्रकार, अभिनेत्रीच्या बहिणीने थेट..
बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे बघायला मिळत आहेत. हेच नाही तर बिग बॉस 17 चा फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर आलाय. नुकताच विकी जैन हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडलाय. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही नक्कीच बघायला मिळतंय.

मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. हेच नाही तर नुकताच बिग बॉस 17 च्या घरात प्रेस झाली. यावेळी पत्रकार हे घरातील सदस्यांना अनेक प्रश्न करताना दिसले. आता बिग बॉस 17 ला त्याचे टाॅप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. अंकिता लोखंडे, मनारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारुकी हे टाॅप 5 फायनलिस्टमध्ये पोहचले आहेत. नुकताच अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा बिग बॉस 17 मधून बेघर झालाय. बिग बॉस 17 च्या घरात सुरूवातीपासूनच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसले. हेच नाही तर अनेक गंभीर आरोप दोघांनीही एकमेकांवर लावले.
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये देखील मोठे वाद होताना दिसले. अंकिता लोखंडे हिला अजिबातच पती विकी जैन याच्यासोबत मनारा चोप्रा हिने बोलले आवडत नसे. हेच नाही तर मनारा चोप्रा हिला देखील यावरून खडेबोल सुनावताना अंकिता लोखंडे ही दिसलीये. यांच्यामध्ये सतत वाद बघायला मिळाले.
आता नुकताच मनारा चोप्रा हिची बहीण मिताली हांडा ही अंकिता लोखंडे हिच्यावर चांगलीच भडकलेली दिसत आहे. हेच नाही तर मिताली हांडा हिने अंकिता लोखंडे हिला आरसाच दाखवलाय. मिताली हांडा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा खुलासा देखील केलाय. यावेळी अंकिता लोखंडे हिला खडेबोल सुनावताना मिताली हांडा ही दिसतंय.
मिताली हांडा हिने यासोबतच एक फोटो देखील शेअर केलाय. या फोटोमध्ये अंकिता लोखंडे हिने साडी घातल्याचे बघायला मिळतंय. मिताली हांडा हिने लिहिले की, जेव्हा अंकिता लोखंडेने माझ्या बहिणीसाठी पाठवलेले मनारा चोप्राचे कपडे घातले होते…मनारा खूप जास्त दयाळू मुलगी आहे, ती तिचे कपडे देखील देते.
कारण जेणे करून ती (अंकिता लोखंडे) ही मीडियासमोर चांगली दिसावी. मात्र, इथे अंकिता लोखंडे ही मनारा चोप्रा हिच्या विरोधात बोलताना दिसत आहे. अंकिता तुला सलाम… तू खूप जास्त असंवेदनशील आहेस…आता मनारा चोप्रा हिच्या बहीणीने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.