मनोज वाजपेयींच्या इंटिमेट सीन्सची अन् लिपलॉकची चर्चा; अभिनेता म्हणाला ‘कानाला खडा लावला’

मनोज वाजपेयींनी चित्रपटातील बोल्ड सीन्सवर खुलासा केला आहे. हे सीन्स करण्यासाठी होकार देणं ही चूक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांच्या बायकोच्या याबद्दल काय प्रतिक्रिया होत्या याबद्दलही त्यांनी सांगितले आहे.

मनोज वाजपेयींच्या इंटिमेट सीन्सची अन् लिपलॉकची चर्चा; अभिनेता म्हणाला 'कानाला खडा लावला'
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 7:08 PM

मनोज वाजपेयी यांच्या साधेपाणापद्दल आणि सच्चेपणाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. त्यांचा अभिनय म्हणजे लोकांच्या मानवर राज्य करतोच पण सोबतच ती एक कायमची आठवण ठेऊन जातो. आजपर्यंत मनोज यांना बऱ्याच भूमिकांमधून प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. धीरगंभीर, प्रभावशाली किंवा कॉमेडी अशा भूमिकांमध्येच आपण त्यांना पाहिलं आहे. पण पहिल्यांदाच त्यांनी असे काही सीन शूट केले आहेत ज्यामुळे सध्या प्रचंड चर्चा होताना दिसत आहेत.

मनोज वाजपेयी किसींग, इंटिमेट सीन्समुळे चर्चेत

मनोज वाजपेयी ‘डिस्पॅच’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात मनोज वाजपेयींनी अनेक किसींग, इंटिमेट सीन्स दिले आहेत. बाथरुम किंवा कारमध्ये अभिनेत्रीसोबत लिपलॉकचेही सीन त्यांनी दिले आहेत.’झी 5′ वर हा सिनेमा रिलीज झाला आहे. मनोज यांना असे सीन्स करताना पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. मनोज यांनी या सीन्सला कसा होकार दिला याबाबत नुकतंच भाष्य केलं.

डिस्पॅचमधील इंटिमेट सीन्स तुफान व्हायरल

‘डिस्पॅच’ सिनेमात अभिनेत्री शहाना गोस्वामीने मनोज वाजपेयींच्या पत्नीचं काम केलं आहे. दोघांचे इंटिमेट सीन्स तुफान व्हायरल होत आहेत. एका मुलाखतीत मनोज वाजपेयींनी याबद्दस सांगितले की, “माझी याबाबत दिग्दर्शकासोबत खूप चर्चा झाली. त्यांनी मला हे सीन करण्यास राजी केलंच. हे सीन्स स्क्रीप्टची गरज होती हे मलाही कळत होतं. खूप इंटेन्स सीन आहेत. मी सीन्स करण्यास तयार झालो पण माझ्यातला गावातला मुलगा मला थांबवत होता. जो लाजाळू, रिझर्व असा आहे.” असं म्हणत त्यांनी हे सीन्स शूट करण्यासाठी त्यांना फार मनाची तयारी करावी लागली असं सांगितलं.

बायकोची प्रतिक्रिया काय होती?

या सीन्सवर त्यांच्या बायकोची प्रतिक्रिया काय होती असही विचारण्यात आलं, यावर ते म्हणाले की, “माझी बायको याबाबतीत फारच कूल आहे. हा आणि माझ्या पत्नीने उद्या हे सीन्स दिले तरी मला अडचण नाही. कोणत्याही सिनेमा आणि कथेबाबत ती खूप चांगली परीक्षक आहे. त्यामुळे तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण माझी लढाई स्वत:सोबतच होती. मी छोट्या गावातून आलो आहे. मला नेहमीच अशा गोष्टी करायला भीती वाटते. लग्नाआधी माझे जे काही रिलेशन होते त्यातही माझी आय लव्ह यू बोलण्याची हिंमत व्हायची नाही. नेहमी मुलीच बोलायच्या. मी मोकळेपणाने जे वाटतं ते बोलू शकत नाही. मी आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींमध्ये ही सर्वात कठीण गोष्ट होती. यानंतर आता मी कानाला खडा लावला आहे.”

मनोज यांच्या या वक्तव्यावरून तरी या चित्रपटातील हे सीन्स शेवटचेच असून पुन्हा कोणत्याच चित्रपटात असे इंटिमेट सीन्स ते शक्यतो देणार नाहीत असंच दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटातील मनोज यांचा अभिनय मात्र नेहमीप्रमाणेच दमदार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.