‘हा’ अभिनेता करणार राजकारणात एन्ट्री, थेट लढणार या पक्षाकडून लोकसभा निवडणूक? अभिनेत्याकडून थेट..

गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा ही तूफान रंगताना दिसत आहे. आता यावर अभिनेत्याकडून मोठा खुलासा हा करण्यात आलाय. अभिनेत्याच्या या खुलाश्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. नोज बाजपेयी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.

'हा' अभिनेता करणार राजकारणात एन्ट्री, थेट लढणार या पक्षाकडून लोकसभा निवडणूक? अभिनेत्याकडून थेट..
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 1:12 PM

मुंबई : बाॅलिवूड चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता मनोज बाजपेयी हे आहेत. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मनोज बाजपेयी हे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा ही रंगताना दिसत आहे की, मनोज बाजपेयी हे आता राजकारणामध्ये धमाका करणार आहेत. फक्त हेच नाही तर मनोज बाजपेयी हे आगामी लोकसभा निवडणुकही लढणार आहेत. इंडिया गठबंधनचे उमेदवार मनोज बाजपेयी असणार असल्याची तूफान चर्चा रंगत आहे. या सर्व चर्चांनंतर मनोज बाजपेयी यांचे चाहते त्यांना याबद्दल सतत प्रश्न विचारताना दिसत आहेत. आता याबद्दल थेट मनोज बाजपेयी यांनीच भाष्य केले.

मनोज बाजपेयी खरोखरच राजकारणात प्रवेश करणार का हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. शेवटी आता यावर मनोज बाजपेयी यांनीच मोठे भाष्य करत मोठे संकेत हे दिले आहेत. नुकताच मनोज बाजपेयी यांनी एक पोस्ट रिशेअर करत लिहिले की, ठीक आहे…मला सांगा…हे कोणी सांगितले किंवा काल रात्री तुम्हाला याबद्दल स्वप्न पडले का? बोला बोला…

आता मनोज बाजपेयी यांच्या या पोस्टवर हे स्पष्ट होतंय की, सध्यातरी ते राजकारणात प्रवेश करणार नाहीत. इतकेच नाही तर अशाप्रकारच्या चर्चा करणाऱ्यांना मनोज बाजपेयी यांनी फटकारल्याचे या पोस्टवरून स्पष्टपणे दिसत आहे. आता मनोज बाजपेयी यांनी रिशेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, अजूनही चर्चा रंगताना दिसतं की, मनोज बाजपेयी हे राजकारण प्रवेश करू शकतात.

मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मनोज बाजपेयी यांना त्यांच्या अभिनयामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय. मनोज बाजपेयी यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मनोज बाजपेयी हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात.

मनोज बाजपेयी हे राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा ही उगाच सुरू झाली नाहीये. त्याचे कारणही तेवढे मोठे आहे. सप्टेंबर 2022 मध्ये मनोज बाजपेयी हे लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये भेट घेतली. विशेष म्हणजे लालू प्रसाद यादव आणि मनोज बाजपेयी यांच्यामध्ये बऱ्याच काळ चर्चा देखील झाली. यामुळेच असे सांगितले जातंय की, मनोज बाजपेयी हे चंपारण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.