Manoj Bajpayee | मनोज बाजपेयींनी 14 वर्षांपासून केलं नाही डिनर; असं करण्यामागचं कारण काय?

सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला.

Manoj Bajpayee | मनोज बाजपेयींनी 14 वर्षांपासून केलं नाही डिनर; असं करण्यामागचं कारण काय?
Manoj BajpayeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:38 PM

मुंबई : आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या डाएटविषयी महत्त्वाचा खुलासा केला. गेल्या 14 वर्षांपासून त्यांनी रात्रीचं जेवण केलंच नाही. रात्री काहीच खात नसल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज बाजपेयी हे त्यांच्या आरोग्यासाठी असं करतात. सर्वसाधारणपणे लोक फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योग करतात, जिमला जातात आणि तिन्ही वेळा योग्य डाएट फॉलो करतात. मात्र मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या रुटीनमधून डिनरला पूर्णपणे काढून टाकलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी डिनर करणं का सोडून दिलं, याविषयीचा खुलासा केला.

अशी झाली सुरुवात

“या गोष्टीला 13-14 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी विचार केला की माझे आजोबा माझ्यापेक्षाही बारिक होते पण ते नेहमीच फिट असायचे. मी सुद्धा त्यांचं रुटीन फॉलो करून पाहतो, असं ठरवलं होतं. त्यांच्यासारखा दिनक्रम पाळू लागलो तेव्हा माझं वजन नियंत्रणात आलं होतं. मी दिवसभर उत्साही असायचो आणि मला फार निरोगी वाटायचं. तेव्हा मी ठरवलं की आता आयुष्यभर मी हाच नियम पाळणार”, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनत नाही”

मनोज बाजपेयीने पुढे म्हटलं, “मी कधी 12 तास तर कधी 14 तास उपवास करून पाहिलं. हळूहळू मी रात्रीचं जेवण बंद केलं. दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनायचं नाही. जेव्हा आमची मुलगी हॉस्टेलमधून घरी येते, तेव्हाच दुपारनंतर जेवण बनवलं जातं.”

सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला. याच कारणामुळे मला कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीज नाही, असं तो सांगतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.