Raveena Tandon | सहा लेयर्सची पोलीस सुरक्षा, 10 हजारांची गर्दी; जेव्हा रवीनाला मिळाली इंदिरा गांधींसारखी वागणूक

शूल या चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. मात्र चित्रपटात रवीनाला मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्यास ती फारसे तयार नव्हते. खुद्द रवीनाने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

Raveena Tandon | सहा लेयर्सची पोलीस सुरक्षा, 10 हजारांची गर्दी; जेव्हा रवीनाला मिळाली इंदिरा गांधींसारखी वागणूक
Raveena TandonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 10:16 AM

मुंबई : अभिनेते मनोज बाजपेयी त्यांच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखले जातात. ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘शूल’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. त्यांनी करिअरमध्ये ज्या पहिल्या मोठ्या अभिनेत्रीसोबत काम केलं होतं, ती रवीना टंडन होती. ‘शूल’ या चित्रपटात दोघांची जोडी पहायला मिळाली. आता चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी मनोज यांनी सेटवरील मजेशीर किस्सा सांगितला. ज्याठिकाणी चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं, तिथे रवीना टंडनला पाहण्यासाठी जवळपास 10 हजार लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळी रवीना बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असायचे.

बेतियाँ या गावात ‘शूल’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्याठिकाणी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. “गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. रवीना टंडन त्यावेळी सुपरस्टार होती आणि करिअरच्या शिखरावर होती. माझे वडीलसुद्धा तिला पाहण्यासाठी आले होते. जर लोकांनी बॅरिकेट तोडून किंवा त्यावरून उडी मारून आत प्रवेश केला असता तर दंगलच झाली असती”, असं मनोज म्हणाले.

हे सुद्धा वाचा

याविषयी ते पुढे म्हणाले, “शूटिंग संपल्यानंतर आम्ही ज्याप्रकारे रवीनाला तिथून बाहेर काढलं, ती घटना जणू ऐतिहासिकच होती. रवीनाच्या अवतीभोवती पोलिसांच्या सहा तुकड्या तैनात होत्या. मी जेव्हा तिला विचारलं की, काही समस्या तर नाही ना? त्यावर ती म्हणाली, मला इथे इंदिरा गांधी असल्यासारखं वाटतंय.” 1990 मध्ये मनोज बाजपेयी आणि रवीना यांचा ‘शूल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती.

शूल या चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. मात्र चित्रपटात रवीनाला मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्यास ती फारसे तयार नव्हते. खुद्द रवीनाने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. “शूलमध्ये मी गरीब घरातील मंजिरीची भूमिका साकारली होती. अत्यंत गरीब आणि साधा असा मंजिरीचा वेश होता. ही साधी भूमिका मी साकारू शकेन का, अशी शंका राम गोपाल वर्मा यांच्या मनात होती. ते मला म्हणाले, “नाही यार रवीना, मी जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा तू मला ‘अखियों से गोली मारे’ याच गाण्यातील रवीना दिसते.” मंजिरीच्या भूमिकेत मी योग्य दिसेन का, असा प्रश्न त्यांना होता”, असं रवीना म्हणाली होती.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.