सिने विश्वातील एका पर्वाचा अंत, मनोज कुमार अनंतात विलीन
'जिंदगी एक पहेली है, कभी दुश्मन कभी सहेली है...', सिने विश्वातील एका पर्वाचा अंत, मनोज कुमार अनंतात विलीन... त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले...

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्यावर शनिवारी 5 एप्रिल रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीतील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मध्ये भारत कुमार यांच्या पार्थिवावर त्यांचा मोठा मुलगा कुणाल गोस्वामी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना दिसला. पंचतत्वात विलीन होण्यापूर्वी मनोज कुमार यांना राज्य सन्मानाने 21 तोफांची सलामी देण्यात आली.
मनोज कुमार यांचा मृतदेह पाहून त्यांची पत्नी शशी गोस्वामी यांना रडू कोसळले. मनोज कुमार यांना निरोप देण्यासाठी अभिताभ बच्चन, अभिषेक, सलीम खान आणि अरबाज खान यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटीही पवन हंस स्मशानभूमीत पोहोचले. यादरम्यान अभिनेता प्रेम चोप्रा म्हणाले, “आम्ही सुरुवातीपासून एकत्र आहोत आणि हा प्रवास खूप छान होता..’
View this post on Instagram
मनोज कुमार यांनी अभिनयातील करिअरची सुरुवात 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांचा ‘कांच की गुडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते मुख्य अभिनेते होते आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला होता.
View this post on Instagram
मनोज कुमार यांच्या निधनानंत बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का बसला आहे. तर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘उपकार’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘पूरब पश्चिम’, ‘हरियाली और रास्ता’, ‘दस नंबरी’, ‘क्रांती’ यांसारख्या अनेक सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत मनोज कुमार यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं.
मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबादमध्ये झाला, जो फाळणीनंतर पाकिस्तानचा हिस्सा बनला. मनोज कुमार यांच्या आईवडिलांनी तेव्हा भारताची निवड केली आणि दिल्लीला राहायला आले. मनोज कुमार यांनी फाळणीचं दु:ख स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे.