वयाच्या 51 व्या वर्षी मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा; शेअर केले पत्नीच्या डोहाळ जेवणाचे फोटो

मनोज तिवारी यांच्या घरात होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; 51 व्या वर्षी होणार तिसऱ्यांदा बाबा

वयाच्या 51 व्या वर्षी मनोज तिवारी तिसऱ्यांदा होणार बाबा; शेअर केले पत्नीच्या डोहाळ जेवणाचे फोटो
Manoj TiwariImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 7:59 AM

मुंबई: भाजप खासदार, भोजपुरी गायक आणि प्रसिद्ध अभिनेते मनोज तिवारी यांच्या घरात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा पिता बनणार आहेत. नुकतंच त्यांच्या पत्नीचं डोहाळे जेवण पार पडलं. या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वयाच्या 51 व्या वर्षी मनोज तिवारी हे तिसऱ्यांदा पिता बनणार आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ-

मनोज तिवारी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नीच्या ‘गोद भराई’चे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ‘काही आनंद आपण शब्दांत वर्णन करू शकत नाही, त्याला फक्त अनुभवता येतं’, असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

गोद भराईच्या कार्यक्रमासाठी सुरभी यांनी लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर मनोज तिवारी यांनी गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली आहे. सोशल मीडियावरील या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांकडून तसंच भोजपुरी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.

‘हा आनंद सदैव तुमच्या आयुष्यात राहू दे’, अशी कमेंट अभिनेत्री अक्षरा सिंहने केली. तर ‘शुभेच्छा, तुम्ही नेहमी असंच खूश राहा’, असं अभिनेत्री आम्रपाली दुबेनं म्हटलंय. गायक विशाल मिश्रा यांनीसुद्धा मनोज तिवारी आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरभी तिवारी या मनोज तिवारी यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. काही वर्षांपूर्वी मनोज आणि त्यांची पहिली पत्नी रानी यांचा घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून मनोज यांना एक मुलगी आहे. 2020 मध्ये त्यांनी भोजपुरी गायिका सुरभीशी लग्न केलं. सुरभी आणि मनोज तिवारी यांना एक मुलगी आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.