Miss universe 2021 : भारताच्या अप्सरा एकाच वर्षी दोन किताब जिंकणार? मनसा वाराणसीकडे सर्वांच्या नजरा
हरजान संधूने यावर्षीचा मिस युनिवर्सचा किताब जिंकून भारताची मान जगात उंचवली आहे. त्यानंतर आता मनसा वाराणसी मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यास एकाच वर्षी दोन किताब जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. ही 70 वी स्पर्धा असून यात एकूण 97 देशांनी सहभाग घेतला आहे.
मुंबई : मिस युनिवर्सचा किताब हरजान संधूने जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, त्या मिस वर्ल्ड स्पर्धेकडे. हरजान संधूने 2021 चा मिस युनिवर्सचा किताब जिंकून इतिहास रचला आहे, आता हाच इतिहास भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मनसा वाराणसी रचणार का? याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा कोविडमुळे काही काळ लांबली होती. ही स्पर्धा 16 डिसेंबरला पार पडत आहे.
एकाच वर्षी भारताला दोन किताब मिळणार?
हरजान संधूने यावर्षीचा मिस युनिवर्सचा किताब जिंकून भारताची मान जगात उंचवली आहे. त्यानंतर आता मनसा वाराणसी मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यास एकाच वर्षी दोन किताब जिंकण्याचा विक्रमही भारताच्या नावावर होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. ही 70 वी स्पर्धा असून यात एकूण 97 देशांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे मनसा वाराणसीसाठी ही स्पर्धा सोपी जाणार नाही. यात 97 देशातील सुंदर महिला एका विजेतेपदासाठी एकमेकींशी स्पर्धा करतील.
मनसा वाराणसी मिस इंडिया 2020
मनसा वाराणसी ही 2020 ची मिस इंडिया विजेची आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास निश्चितच चांगला राहणार आहे. मनसा वाराणसी मूळची हैदराबादची आहे. तिचे वय सध्या 23 वर्षे आहे. मनसा वारणसीने इंजीनिअरिंग केले आहे. ती फाइनान्स इंफॉर्मेशन एक्सचेंज एनालिस्ट आहे. ग्लोबल इंडियन स्कूलमध्ये तीने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. ती लहानपणापासूनच सौदर्य स्पर्धेत भाग घेत आली आहे. तिची हीच मेहनत तिला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर घेऊन आली आहे. त्यामुळेच तिने गेल्यावर्षीचा मिस इंडियाचा किताबही जिंकला आहे. मनसाचे प्ररणास्थान प्रियंका चोपडा आहे. ती प्रियंकाला खूप मानते. मनसाला पुस्तके वाचण्याचा आणि योगा करण्याचा छंद आहे.