Maratha Reservation : ‘मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय’, कलाकारांना देखील सातवतेय पाटलांच्या प्रकृतीची चिंता

Maratha Reservation : मराठा समाजासोबत कलाकारांना देखील सतावते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता... 'या' मराठी अभिनेत्याने भावना केल्या व्यक्त... सर्वत्र फक्त आणि फक्त जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची चर्चा सुरु

Maratha Reservation : 'मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय', कलाकारांना देखील सातवतेय पाटलांच्या प्रकृतीची चिंता
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 12:35 PM

मुंबई : 31 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे… मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या… अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यासाठी पाटील यांचं सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांची प्रकृती देखील खालवली असल्याची माहिती समोर आली… तेव्हा मराठा समाजाच्या बांधवांनी त्यांनी पणी पिण्यासाठी आग्रह केला. समाजाच्या आग्रहामुळे जरांगे पाटील पाणी प्यायले. अशात फक्त मराठा समाजालाच नाही तर, कलाकारांना देखील मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती चिंता सतावत असल्याचं चित्र समोर येत आहे. म्हणून जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करा आणि मराठा समाजातील लोकांना लवकरात-लवकर सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजातील लोकांचे महाराष्ट्रभर आंदोलन सुरु असताना मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने प्रतिक्रिया दिली आहे. हेमंत ढोमेने म्हणाला, ‘आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय.. मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!’ सध्या सर्वत्र हेमंत ढोमेने याने केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

नुकताच जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. ‘महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हलचाली या दोन दिवसात विशेष अधिवेश घेवून सुरु कराव्यात. कारण आता आम्ही थांबायला तयार नाही…’असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.

एवढंच नाही तर, कोणी आत्महत्या करु नका, शांततेत आंदोलन करा, मराठा समाजाच्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या…एकही मराठ्यांचा माणूस तुम्हाला विसरणार नाही. असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे.

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.