प्रसिद्ध अभिनेता फोटोग्राफरच्या प्रेमात; प्रेमाची कबुली देत थेट लग्नाची मागणी
सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असताना अजून एक अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. हा अभिनेता एका फोटोग्राफरच्या प्रेमात असून त्याने थेट लग्नाची मागणी घातली आहे. त्यामुळे आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
सध्या मराठी असो किंवा बॉलिवूडमध्ये लग्नाचा ट्रेंडच सुरु झाला आहे. यावर्षी अनेकांनी लग्नगाठ बांधली आहे. आता अजून एक अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एवढच नाही तर या अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची आणि नात्याची कबुली दिली असून लवकरच लग्न करणार असल्याचंही सांगितलं आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेता लवकरच ल्ग्नबंधनात
एका प्रसिद्ध मराठी मालिकेतील अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याची होणारी बायको ही सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे. मराठी मालिका ‘कन्यादान’मध्ये झळकलेल्या लोकप्रिय अभिनेता देवेश काळे प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर सारिका भणगेशी लग्न करणार आहे. नुकतेच त्यांनी त्यांचे प्री-वेडिंग शूटही केलं आहे.
देवेशने त्यांचे प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. होणाऱ्या पत्नीसह त्याने रोमँटिक फोटो शेअर करत देवेशने प्रेमाची कबुली दिली आहे.तसेच हे फोटो शेअर करत “प्रवास तिथून सुरू होतो जिथे मन स्थिर होतं”, असं कॅप्शन त्याने फोटोला दिलं आहे. या फोटोंवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
प्रेमाची कबुली देत प्री-वेडिंग शूट
या फोटोंमध्ये देवेश आणि सारिका यांनी समुद्रकिनारी प्री-वेडिंग शूट केलं आहे. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले दिसत आहेत. दोघांनी कपडेही अगदी एकमेकांना मॅचिंग असे घातलेले पाहायला मिळतात. देवेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट तर, सारिकाने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा वनपीस घातला आहे.
दरम्यान, देवेश काळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘कन्यादान’ या मालिकेसह देवेश ‘पुष्पक विमान’ आणि ‘बांबू’ या चित्रपटांच्या टीमचाही तो एक भाग आहे. तसेच देवेश त्याचे फिरण्याचे व्हिडीओही त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.
लग्नाची तारीख कधी?
या दोघांच्या फोटोंवर चाहत्यांसहित सौरभ चौघुले, श्रेया बुगडे, चेतन गुरव, मधुरा देशपांडे, ऋतुजा कुलकर्णी या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव आणि छान कमेंटस् केल्या आहेत. तसेच आता प्री-वेडिंग शूटनंतर ही जोडी लग्नाची तारीख कधी जाहीर करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.