Kiran Mane: सलाईन.. इंजेक्शन आणि असह्य वेदना…, किरण माने आयसीयूमध्ये दाखल

Kiran Mane Health: सलाईन.. इंजेक्शन आणि असह्य वेदना..., किरण माने यांना नक्की झालं तरी काय? फेसबूकवर पोस्ट शेअर करत सांगितलं आयसीयूमध्ये दाखल... चाहत्यांकडून चिंता व्यक्त

Kiran Mane: सलाईन.. इंजेक्शन आणि असह्य वेदना..., किरण माने आयसीयूमध्ये दाखल
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 9:07 AM

अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम राजकारणावर स्वतःचं ठाम मत मांडणारे किरण माने सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. किरण माने यांची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आणि चर्चेत असते. पण आता किरण माने यांची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत किरण माने यांनी आयसीयूमध्ये दाखल असल्याचं सांगितलं आहे. किरण माने यांची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत किरण माने म्हणाले, ‘काल दुपारपर्यंत फिट, तंदुरुस्त, हसतखेळत होतो… आज हॉस्पीटल… सलाईल… इंजक्शन्स आणि प्रचंड असह्य वेदाना… आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं! अर्थात. यावरही मात करून यातूल बाहेर पडेल. फिकीर नॉट…’ अशी पोस्ट करत किरण माने यांनी चाहत्यांना स्वतःच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

किरण माने यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर कमेंटच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘काळजी घ्या आमच्या सदभावना आपल्या सोबत आहेत दादा…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काळजी घ्या दादा.. काय झालंय, लवकर बरे व्हा…’ अनेकांनी कमेंट करत किरण माने यांच्या प्रकृतीची विचारणा केली आहे.

सांगायचं झालं तर, किरण माने यांना आयसीयूमध्ये का दाखल करण्यात आलं आहे. याबद्दल काही कळू शकलेलं नाही. पण आयसीयूमध्ये दाखल होण्याआधी किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये ते म्हणाले, ‘सिंपथी मिळवणं सोपं असतं. कोणाही दुबळ्या, हतबल माणसाला ती सहज मिळते. जेलसी लय कष्टाने कमवावी लागते, संघर्ष करुन यश मिळवणाऱ्या जिगरबाजालाच ती लाभते…’ असे किरण माने म्हणाले होते.

किरण माने यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर ‘बिग बॉस मराठी 4’ मुळे किरण माने यांच्या प्रसिद्ध आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.