‘The kerala story ची वनलाईन रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली…’ मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य

‘द केरळ स्टोरी’सिनेमाची कथा शेकडो वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिली आहे....', मराठी अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल

'The kerala story ची वनलाईन रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली...' मराठी अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 12:15 PM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) सिनेमाची चर्चा सध्या देशभरात रंगत आहे. ५ मे रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी सिनेमाचा विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. त्यांनी बंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. अनेक क्षेत्रातील लोक सिनेमाबद्दल स्वतःचं मत व्यक्त करत असताना अभिनेते योगेश सोमण यांनी सिनेमाचा संबंध थेट रामदास स्वामींशी जोडला आहे. योगेश सोमण यांनी फेसबूकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

योगेश सोमण म्हणाले, ‘दोन दिवसांपूर्वी द केरळ स्टोरी सिनेमा प्रदर्शित झाला आणि इंटरनेटवर किंवा इतर माध्यमांवरुन त्याच्यावर गदारोळ उठला.. कहीजणांनी त्याचं गांभीर्य लोकांना सांगितलं… काही लोकांनी त्याची सत्य – असत्यता याबाबत आपले विचार मांडले आणि अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या अस्मानी सुलतानीच्या चार ओळी आल्या. मी तर म्हणेल की, केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामी यांनी लिहून ठेवली आहे.’

योगेश सोमण पुढे म्हणाले, ”किती गुजरिणी, ब्राह्मीणी भ्रष्टविल्या… किती शांबूखी जहाजी फाकविल्या… किती एक देशांतरी त्या विकिल्या… किती सुंदरा हाल होऊनी मेल्या… या चार ओळींमध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी लिहिल ठेवल्या आहेत…’ सध्या योगोश सोमण यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

एवढंच नाही तर, योगेश सोमण यांनी प्रत्येक शब्दाचा अर्थ देखील सांगितला आहे. शांबूखी शब्दाचा अर्थ सांगताना ते म्हणाले, ‘शांबूही’ हा शब्द ‘शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, तर ‘फाकविल्या’ म्हणजे पाठविल्या.’ सध्या सर्वत्र योगेश सोमण यांच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२  हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाने पाच दिवसांत ५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.