तुमच्या विरोधात खटला दाखल करू शकते…? आर्या आंबेकर का भडकली, काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आर्या अंबेकरने व्यक्त केला संताप, 'तुमच्या विरोधात खटला दाखल करू शकते...', असं का म्हणाली? नक्की काय आहे प्रकरण? सध्या सर्वत्र आर्या अंबेकर हिच्या चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक सेलिब्रिटींचे नको ते फोटो आणि व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. अभिनेत्री रश्मिता मंदाना, आलिया भट्ट यांचे देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यावर आर्या बोलताना दिसतेय. पण मी असं काही बोलले नाही.. असं म्हणत आर्याने संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एका पोस्ट शेअर करत आर्या म्हणाला, ‘काय हा मुर्खपणा आहे. माझ्या कार्यक्रमात मी जे काही बोलली आहे, ते म्यूट करुन तुम्ही माझ्या नावावर वेगळंच काही लिहिलं आहे. जे मी काधी बोललेच नाही. विषय काय आहे, हे देखील मला माहिती नाही.’




‘मी बिग बॉस शो पाहत नाही, कधीच पाहिलाही नाही. मला शोमधील एक स्पर्धकही माहिती नाही. तुम्ही हे जे काही केलंय, त्याच्यासाठी मी तुमच्या विरोधात खटला देखील दाखल करू शकते…अशा चॅनेलला 50 हजार सस्क्राबर्स कसे असतात.’ अशी पोस्ट लिहित रिपोर्ट करण्यासाठी मला मदत करा… असं देखील आर्या म्हणाली आहे.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये आर्या बोलताना दिसतेय. पंढरीनाथ दादा सोडलं तर जागेवर स्थिर कोणाचंचं चित्त नाही… असं व्हिडीओवर लिहिलं होतं. यावर आर्याने संताप व्यक्त केला आहे. आर्या हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
सांगायचं झालं तर,सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ फेक असतात. ज्यांचा सेलिब्रिटींशी काहीही संबंध नसतो. पण अशा सोशल मीडिया पोस्टमुळे सेलिब्रिटींनी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अभिनेत्री रश्मिका हिचा फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.