त्या वास्तूमधे खूपच भयाण…; छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेल्या वास्तूला दिली अभिनेत्रीने भेट
मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेल्या वास्तूला भेट दिल्याचे सांगितले आहे.

सध्या सगळीकडे ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर अभिनेता अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकरली आहे. या चित्रपटानंतर देशात औरंगजेबाची कबर हटवण्याचा वाद सुरु झाला. त्यानंतर अनेकांनी जाऊन ही कबर देखील पाहिली. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्रीने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेल्या वास्तूला भेट दिली. भेट दिल्यानंतर तिने पोस्ट शेअर केली आहे.
‘कुटुंब’, ‘वहिनीची माया,’ ‘सुना’ येती घरा’ अशा हिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री अर्चना नेवरेकर ही सध्या चर्चेत आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केलेल्या संगमेश्वर कसबा येथील वास्तूला भेट दिल्याचे सांगितले आहे. तिने तेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत काढलेला फोटो देखील शेअर केला आहे.




अर्चनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, “संगमेश्वर कसबा जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं…ही वास्तू नेमकी काय आहे? ती वास्तू पाहून मन खिन्न झाले. चांगले नाही वाटले…कदाचित म्हणूनच त्या वास्तूमध्ये खूपच भयाण सत्य लपलेलं आहे..तो वाडा दुःखी दिसतो…मी माझ्या मुलाबरोबर अशा बऱ्याच ठिकाणी जात असते जिथे आपला इतिहास, आपली संस्कृती त्याला समजली पाहिजे… प्रत्येक आई जिजाबाई नाही होऊ शकत. प्रत्येक घरात शिवाजी नाही जन्म घेऊ शकत. पण प्रत्येक घरात जिजाईचे संस्कार आणि हिंदुत्वाविषयी प्रेम प्रत्येक आई देऊच शकते…” असे म्हटले आहे.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “एक चांगला माणूस, चांगला नागरिक आणि चांगला भारतीय घरातूनच घडतो आणि घडवला पाहिजे…त्यासाठी पैशाची नाही तर मनाची तयारी लागते…मी माझ्या मुलाला नेहमी एकच गोष्ट शिकवते चांगला माणूस हो आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण छान जग.”