‘या’ मराठी अभिनेत्रीचा चित्रपट बराक ओबामांचा फेव्हरेट; ओबामांच्या सोशल मीडियावर झळकलं चित्रपटाचे नाव
बराक ओबामा यांनी 2024 सालच्या त्यांच्या आवडत्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा चित्रपटही आहे. बराक ओबामा यांचा या मराठी अभिनेत्रीचा चित्रपट फेव्हरेट ठरला आहे. ओबामा यांच्या सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे दरवर्षी कलाप्रेमींसाठी शिफारस म्हणून त्यांना आवडलेले चित्रपट, पुस्तकं आणि संगीताची यादी शेअर करत असतात. याहीवेळेस ओबामा यांनी 2024 मधील त्यांना आवडलेलं चित्रपट कोणते आहेत याचा खुलासा केला आहे. त्यांच्या सोशल मीडियावर याची एक लिस्टच पोस्ट करण्यात आली आहे.
बराक ओबामांची फेव्हरेट चित्रपटांची यादी
बराक ओबामा मनोरंजन विश्वातील कलाकृतींना अगदी आवर्जून त्यांची दाद देत असतात. ओबामांनी सोशल मीडियावर त्यांच्या फेव्हरेट टॉप 10 सिनेमाची यादी पोस्ट केली. आणि विशेष म्हणजे या लिस्टमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचाही सिनेमा आहे. ही बाब भारतासाठी आणि विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे.
ही मराठमोळी अभिनेत्री आहे छाया कदम. छाया कदम यांची भूमिका असलेला आणि पायल कपाडिया दिग्दर्शित गोल्डन ग्लोब-नामांकित ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा चित्रपट बराक ओबामांच्या यंदाच्या शिफारसीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. एका भारतीय चित्रपटानं ओबामा यांच्या मनावर राज्य केलं ही खरोखरच कौतुकाची बाब आहे.
ओबामांचा मराठमोळ्या अभिनेत्रीचा चित्रपट फेव्हरेट
डेनिस विलेन्युव्हचा ड्युन पार्ट 2, शॉन बेकरचा अनोरा, एडवर्ड बर्गरचा कॉन्क्लेव्ह, माल्कम वॉशिंग्टनचा द पियानो लेसन यासह या वर्षी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा भारतीय चित्रपट उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
बराक ओबामा यांनी त्यांच्या एक्स हॅंडलवर लिहिलंय ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं आहे “इथं काही चित्रपट देत आहे, जे मी या वर्षी पाहण्याची शिफारस करतो.” असं कॅप्शन देत त्यांनी या पोस्टमध्ये त्यांनी यंदा पाहिलेल्या 10 चित्रपटांची यादी दिली आहे.
ज्यामध्ये ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा भारतीय चित्रपट अव्वल स्थानी असून इतर दहामध्ये अनुक्रमे ‘कॉन्क्लेव्ह’, ‘द पियानो लेसन’, ‘द प्रॉमिस्ड लँड’, डून पार्ट टू, ‘अनोरा’, ‘दीदी’, ‘शुगरकेन’, ‘द कम्प्लीट अननोन’ ‘ आणि ‘द सीड ऑफ द सेक्रेड फिग’ या चित्रपटांची वर्णी लागते.
View this post on Instagram
छाया कदम या मराठी अभिनेत्रीची चित्रपटात महत्त्वाची भूमिका
कनी कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या भूमिका असलेला ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ हा चित्रपट फ्रान्समधील पेटिट केओस आणि चॉक अँड चीज आणि भारतातील अनदर बर्थ यांच्यातील अधिकृत इंडो-फ्रेंच सह-निर्मिती आहे.
या चित्रपटात प्रभा ही एक त्रासलेली परिचारिका आहे, जिला तिच्या पतीकडून अनपेक्षित भेट मिळते. अनु ही तिच्या प्रियकराशी जवळीक साधणारी तिची तरुण रूममेट आहे. समुद्रकिनारी असलेल्या शहराची सहल त्यांना त्यांच्या इच्छांचा सामना करण्यास भाग पाडते.
छाया यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक
या चित्रपटात कानी कुसरुती, दिव्या प्रभा आणि हृधू हारून यांच्या भूमिका आहेत, हे सर्व केरळचे मल्याळम भाषेतील कलाकार आहेत. यामध्ये छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. छाया यांच्या यातील भूमिकेचं प्रचंड कौतुकही करण्यात आलं होतं.
View this post on Instagram
या वर्षाच्या सुरुवातीला ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स जिंकून इतिहास रचला होता. याचा प्रीमियर 23 मे रोजी 2024 कान्स चित्रपट महोत्सवात त्याच्या बहुचर्चित ‘स्पर्धा विभागात’ झाला. 30 वर्षांत महोत्सवाच्या मुख्य विभागात प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता.