मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत संजय दत्तचा रोमँटिक सीन, घाबरलेल्या अवस्थेत कसा झाला सीन शूट?
संजूबाबाने मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत दिलेला 'तो' रोमँटिक सीन, अभिनेत्री म्हणाली, 'मी प्रचंड नर्व्हस होते, तेव्हा मला...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...
अभिनेता संजय दत्त याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतो. अनेक अभिनेत्रींसोबत संजूबाबाने स्क्रिन शेअर केली आहे. मराठमोळ्या अभिनेत्यासोबत संजूबाबाने सिनेमात काम केलं. एवंढच नाही तर, अभिनेत्रीसोबत संजूबाबाने रोमँटिक सीन दिला होता. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाली हिने संजूबाबासोबत शूट केलेल्या रोमँटिक सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
सांगायचं झालं तर, ‘मिशन काश्मीर‘ सिनेमात संजूबाबा आणि सोनाली कुलकर्णी यांनी पत्नी – पत्नीची भूमिका साकारली होती. सिनेमातील रोमँटिक सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘संजय दत्त आणि माझा सीन होता. ज्याला बेडरूम सीन असं नाव देण्यात आलं होतं आणि त्याची काहीही गरज नव्हती. पण असं होतं कधी कधी…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘तिथे एक हेअर ड्रेसर होती. तिने मला अचानक विचारलं, तू वॅक्सिंग केलं आहेस ना? मी तिला हो म्हटलं. पण मी घाबरली होती. तिने असं विचारल्यानंतर मी नर्व्हस झाली होती… मी सीनसाठी गेली आणि सीनसाठी तयार होती. पण माझं सीनमध्ये लक्ष लागतंच नव्हतं. मी घाबरली होती आणि माझे हात थरथरत होते.’
सीन सांगत अभिनेत्री म्हणाली, ‘सीनमध्ये संजय दत्त मला म्हणतो अलताफबने मुझे अब्बा बुलाया… तर त्याला मी म्हणते त्याने आधीच मला अम्मी म्हटलं आहे… त्यानंतर आम्हाला दोघांनी मिठी मारायची होती. पण मी खूप नर्व्हस झाले होते. अशात संजय दत्त मला म्हणाला, सीनमध्ये आपल्याला काहीही करायचं नाही. किस देखील करायचं नाही. तू नर्व्हस झाली आहेस म्हणून मी देखील सीन करु शकत नाही…’
‘तू आधी शांत हो… त्यानंतर तो बेडरूम सीन चांगल्याप्रकारे शूट झाला… असं सोनाली कुलकर्णी म्हणाली. ‘मिशन काश्मीर’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 2000 साली प्रदर्शित झाला होता. सिनेमात संजय दत्त, सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत अभिनेता हृतिक रोशन आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होते. सिनेमात सोनाली हिने हृतिक याच्या आईची भूमिका साकारली होती.