‘नातं तुटणं ही फार वाईट…’, घटस्फोटावर पहिल्यांदा स्पष्ट बोलली तेजश्री प्रधान
Tejashri Pradhan on Divorce: ते माझ्या नशिबात होणार होतं आणि त्यासाठी मी दुसऱ्याला..., घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली तेजश्री प्रधान..., वयाच्या 25 व्या वर्षी तेजश्रीने अभिनेता शशांक याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही...

मराठी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अणि लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान कायम तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ‘होणार सुन मी या घरची’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असताना तेजस्वी हिने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर शशांक याने दुसरं लग्न करून संसार थाटला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तेजश्री हिने घटस्फोटावर मोठं वक्तव्य केलं आहे.
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री तेजश्री म्हणाली, जेव्हा अशी परिस्थिती तुमच्या आयुष्यात येणार असेल तेव्हा दैवत ते बळ आपल्याला देतं. जेव्हा तुम्हाला वाटतं काही तरी चुकीचं होत आहे, तेव्हा ते बळ येत आणि निर्णय घेतला जातो. आज विचार केल्यानंतर मला त्या गोष्टी फार काठीण वाटतात. पण जेव्हा कठीण परिस्थिती समोर येते तेव्हा ते बळ आपल्यात येत आणि गोष्टी मार्गी लागल्यानंतर ते बळ आपल्यातून निघून जातं. मला असं वाटतं दोन चांगली माणसं दोन चांगले लाईफ पर्टनर असणं गरजेचं नाहीये…
सगळ्यात आधी एक महत्त्वाची गोष्ट जी मी केली होती माझ्या बाबतीत आणि जर का आज ही गोष्ट खूप कॉमन झाली आहे तर, मला सांगायला आवडेल, माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी मला त्या माणसाला दोषी ठरवायचं नाही. ज्या व्यक्तीने मला वेदना दिल्या आहेत, किंवा माझ्यामुळे त्या व्यक्तीला वेदना झाल्या आहेत… त्यामुळे त्या व्यक्तीला एवढं महत्त्व द्यायचं नाही की सर्व काही तुझ्यामुळे झालं. जे काही व्हायचं होतं ते झालं आहे. ते माझ्या नशिबात होणार होतं आणि त्यासाठी मी दुसऱ्याला दोषी ठरवून मी त्या माणसाला मोठं करणार नाही.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अशा परिस्थिती सर्वात आधी स्वतःला माफ करायचं. कठीण परिस्थितीत आपण जे काही निर्णय घेतो, त्या वेळी ते निर्णय आपल्याला योग्य वाटलेले निर्णय असतात. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलंच करण्याचा निर्णय घेतला होता किंवा समोरच्याच्या आयुष्याची वाट लावण्याचा निर्णय घेतला होता? असं काही नव्हतं. पुढे जाऊन हे होणारं होतं आणि ते झालं… हा प्रवास ठरलेला होता. एखादं नातं तुटणं ही फार वाईट गोष्ट आहे. फक्त दोघांसाठी नाही तर, दोन्ही कुटुंबासाठी नातं तुटणं ही वाईट गोष्ट असते.’ असं म्हणत तेजश्रीने भावना व्यक्त केल्या…