‘आपलं काळीज हाय तू’चं रहस्य उलगडणार, ‘वन फोर थ्री’ चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होणार

'वन फोर थ्री' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक प्रेमी युवक युवती या ट्रेलरला त्यांच्या व्हॅलेंटाईनला डेडिकेट करू शकेल असा हा ट्रेलर आहे.

'आपलं काळीज हाय तू'चं रहस्य उलगडणार, 'वन फोर थ्री' चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होणार
वन फोर थ्री
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 3:00 PM

आयेशा सय्यद, मुंबई : दिग्दर्शक योगेश भोसले (Yogesh Bhosale)वन फोर थ्री(143 Movie) हा आपला मराठी चित्रपट येत्या ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस आणत असून तत्पूर्वी या चित्रपटाची एक खास झलक म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करून त्यांनी रसिक प्रेक्षकांना आणि प्रेमीयुगुलांना ‘व्हॅलेंटाईन डे(Valentine’s day) ची भेट दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक प्रेमी युवक युवती या ट्रेलरला त्यांच्या व्हॅलेंटाईनला डेडिकेट करू शकेल असा हा ट्रेलर आहे. ‘आपलं काळीज हाय तू’ (Aapal Kkalij Hay Tu), ‘करेन तर मामाचीच’ या टॅगलाईन सध्या सोशल मीडियावर गाजल्या आहेत नेमक्या या टॅगलाईन काय आहेत हे नुकतेच चित्रपटाच्या ट्रेलरमधून उघडकीस आले आहे. ‘वन फोर थ्री’ चित्रपटाची चर्चा सध्या मनोरंजनविश्वात रंगलेली तर आहेच त्यात या उत्कंठावर्धक आणि लव्हेबल ट्रेलरने दणक्यात केलेल्या एन्ट्रीने रसिकांची उत्सुकता अधिकच ताणून धरली जाणार आहे. पहिल्या नजरेतला पहिल्या वाहिल्या प्रेमाने व्याकुळलेली चित्रपटातील जोडगोळी प्रेमाची ग्वाही देताना दिसणार आहे. दाक्षिणात्य धाटणीच्या या चित्रपटात साऊथ स्टाईलने ही जोडी आपले प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे.

‘वन फोर थ्री’ चित्रपट हा दाक्षिणात्य धाटणीचा असून रिअल लाईफ स्टोरीवर आधारित आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर व्हॅलेंटाईन डे चे औचित्य साधत प्रेमीयुगुलांसाठी पर्वणीच ठरला आहे. या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांची रोमँटिक जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आली आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत असून खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. मधू आणि विशूची प्रेमकहाणी तर अनंताचा जबरा खलनायकी रूप प्रेक्षकांना नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंकाच नाही.

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर विशू आणि मधुची लव्हस्टोरी पूर्ण होईल का? एकमेकांसाठी बनलेल्या विशू आणि मधूला त्यांचे प्रेम एकत्र ठेवेल का? मधू आणि विशूच्या प्रेमात अनंता अडथळा आणेल का? असे अनेक प्रश्न पडले असतील मात्र या पडलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळतील. हल्लीच या चित्रपटातील एका गाण्याने तरुणाईच्या दिलावर राज्य करत 3 दिवसात 3 लाखहून अधिक व्युज मिळवले. साऊथ स्टाईलने हा चित्रपट प्रेम व्यक्त करण्यास प्रेमींना भेट ठरणार हे नक्की.

नुकत्याच ‘वन फोर थ्री’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने वाढवलेली उत्कंठा अधिक न ताणता हा चित्रपट प्रेमाचे विविध रंग घेऊन ४ मार्चला सोनेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

संबंधित बातम्या

पांढरी साडी त्यावर साजेशी गोल टिकली, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाचा ‘गंगूबाई’ लूक, पाहा टॉप 5 फोटो

Bachchhan Pandey : दिल थाम करके बैठों…तुम्हाला घाबरायला, हसायला येतोय बच्चन पांडे, ‘या’ दिवशी होणार ट्रेलर रिलीज!

नेमके अच्छे दिन कुणाचे? एबीजी शिपयार्ड घोटाळ्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सवाल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.