Mahesh Kothare | मालिकेच्या सीन दरम्यान घडली चूक, महेश कोठारेंनी मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी! पाहा नेमकं काय झालं…
मराठी मनोरंजन विश्वात मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ मालिकांच्या कथाच नव्हे तर, त्यातील पात्र, त्यांचा अभिनय आणि त्यांचे पेहराव देखील प्रेक्षकांच्या आकर्षणाची कारणे बनली आहेत. मात्र, या सगळ्यात काही वेळा अशा चुका घडतात की, मालिकेच्या निर्मात्यांना प्रेक्षकांची आणि चाहत्यांची माफी मागावी लागते.
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. केवळ मालिकांच्या कथाच नव्हे तर, त्यातील पात्र, त्यांचा अभिनय आणि त्यांचे पेहराव देखील प्रेक्षकांच्या आकर्षणाची कारणे बनली आहेत. मात्र, या सगळ्यात काही वेळा अशा चुका घडतात की, मालिकेच्या निर्मात्यांना प्रेक्षकांची आणि चाहत्यांची माफी मागावी लागते. असंच काहीसं घडलंय अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यासोबत देखील असेच काहीसे घडले आहे.
महेश कोठारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. मालिकेतील एका चुकीमुळे त्यांना प्रेक्षक आणि चाहत्यांची जाहीर माफी मागावी लागली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतील एका दृश्यातील पेहरावामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
काय आहे हा नेमका वाद?
स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ प्रेक्षकांना भरपूर आवडत आहे. यां मालिकेतील गौरी-जयदीप यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावली आहे. याच मालिकेतील 14 सप्टेंबरच्या भागात ‘सँडी विश्वास’ या पात्राच्या ब्लाऊज डिझाईनवर ‘गौतम बुद्धां’चे चित्र रेखाटलेले होते. यामुळे अनेक प्रेक्षकांनी यावर आक्षेप घेतला होता. या दृश्यातील सदर प्रकरणामुळे समजातील काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्याबद्दल मी जाहीर माफी मागतो, असे म्हणत महेश कोठारे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, आमचा कुणालाही दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
प्रेक्षकांनीही केले माफ!
‘स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ या बॅनर खाली बनत आहे. मालिकेतील सदर प्रकरणामुळे आता महेश कोठारे यांनी जाहीर माफी मागितली आहे. तर, यानंतर प्रेक्षक आणि चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करत त्यांची माफी स्वीअकर करत त्यांना माफ केले आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, ‘बुद्धांच्या देशात बुद्धांचा अपमान केलात हे चुकच आहे. परंतु तुम्ही माफी मागून आज तुम्ही अजून जास्त मोठे झालात..’
त्याच वेळी दुसऱ्या एका प्रेक्षकाने लिहिले की, ‘सर, तुम्ही गेली अनेक दशकं संपूर्ण महाराष्ट्रचं मनोरंजन केलं आहे. आणि त्यात तुम्ही कधीच ना अश्लीलतेचा आधार घेतला ना गिमिक्सचा. निखळ विनोद आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम सिनेमे आणि मालिका तुम्ही महाराष्ट्राला दिल्या आहेत. तुमची इतक्या वर्षांची यशस्वी कारकीर्द ह्याची साक्षीदार आहे. म्हणून मला खात्री आहे की संपूर्ण महाराष्ट्र ह्या नकळत झालेल्या चुकीला समजून घेईल,आणि माफ करेल. तुम्ही स्वतः पुढे येऊन हा व्हिडीओ पोस्ट केला ह्यातच तुमचा सच्चेपणा आहे.’
हेही वाचा :
‘तूच माझा खरा मानव…’, ‘पवित्र रिश्ता’चे गाणे गात अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत कापला केक!