‘यंदाचा उन्हाळा होणार सनी’, ललित प्रभाकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सनी’ असं या मराठी चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमे सांभाळणार आहे.

‘यंदाचा उन्हाळा होणार सनी’, ललित प्रभाकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
ललित प्रभाकर
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 12:22 PM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचा अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सनी’ असं या मराठी चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमे सांभाळणार आहे. नुकतेच ललित प्रभाकर याने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

ललित प्रभाकर सध्या आलोक राजवाडे आणि अभय महाजन यांच्या सोबत ‘भाडिप’च्या ‘शांतीत क्रांती’ या सीरीजमध्ये झळकत आहे. तर, ललितचा हा नवा चित्रपट ‘सनी’ पुढच्या वर्षी अर्थात 2022च्या उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ललितसोबत आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही.

पाहा पोस्टर :

अभिनेता ललित प्रभाकरसह दिग्दर्शक-अभिनेता हेमंत ढोमे, आणि इतर अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे हे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात ललित ‘सनी’च्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळते आहे. अर्थातच हा चित्रपट ‘सनी’ भोवतीच फिरणार असल्याचे लक्षात येत आहे. मात्र, चित्रपटाविषयीची अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. आता हा चित्रपट आणि त्याची कथा नेमकी काय असणार, याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे. प्रेक्षक आणि चाहते देखील चित्रपटाच्या पुढील अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ललित प्रभाकर दिसणार ‘झोंबी’पटात!

बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटात हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये झोंबिवर आधारित चित्रपट पाहिले आहेत. पण, मराठीत पहिल्यांदाच झोंबिवर आधारित चित्रपट बनतोय. या चित्रपटाचे शिर्षकही इंटरेस्टिंग आहे. डोंबिवलीमधील झोंबिज असे कनेक्शन असल्यामुळे चित्रपटाचे नाव ‘झोंबिवली’ असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘झोंबिवली’ हा चित्रपट तरुण पिढीला लक्षात ठेवून बनवला आहे. त्याच बरोबर हॉरर आणि कॉमेडी या दोन्ही गोष्टींचं उत्तम समीकरण प्रेक्षकांना या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे’, असे निर्माते-दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले.

साईनाथ गणुवाड, सिध्देश पुरकर, महेश अय्यर आणि योगेश जोशी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून, एव्ही प्रफुल्ल चंद्रा यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. चित्रपटाचा नवीन विषय, कलाकारांच्या नवीन जोड्या या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. डोंबिवलीमध्ये घडणारी ही ‘झोंबिवली’ची कथा काय आहे, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Mira Rajput | फॅशनच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींना देते टक्कर, पाहा कधी आणि कशी झाली मीरा शाहिदची भेट

Rajat Bedi | ‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, प्रकृती गंभीर

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.