“माझे वडील दादर स्टेशनवर पेपर टाकून झोपले होते….”
होऊ दे धिंगाणा या खास कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करताना दिसतोय. मात्र, यादरम्यान त्याला खूप मोठे गिफ्ट मिळाले आहे.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddhartha Jadhav) स्वत: ची एक वेगळी आणि खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. आतापर्यंतच्या करिअरमध्ये (Career) सिद्धार्थने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. सिद्धार्थच्या अभिनयाने चित्रपट (Movie) फक्त खास होत नाहीत तर धमाकेदार कमाई देखील करतात. सिद्धार्थ आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवतो म्हणजे हसवतोच…प्रेक्षकही सिद्धार्थच्या चित्रपटांवर प्रेम करतात.
सोशल मीडियावर सध्या स्टार प्रवाहवरील आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावरील सिद्धार्थ जाधवचा व्हिडीओ (प्रोमो) तूफान व्हायरल होताना दिसतोय. दे धक्का सारख्या चित्रपटात प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा सर्वांचा आवडता आणि लाडका अभिनेता भावूक झाला आहे. तोच व्हिडीओ आता व्हायरल होतोय.
होऊ दे धिंगाणा या खास कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करताना दिसतोय. मात्र, यादरम्यान त्याला खूप मोठे गिफ्ट मिळाले आहे. कार्यक्रम सुरू असताना त्याला एक सरप्राईज देण्यात आले. सिद्धार्थ जाधवचे आई-वडील आणि भाऊ मंचावर येतात. हे पाहून अगोदर काही वेगळ सिद्धार्थला नेमके काय घडत आहे, हेच कळत नाही.
इथे पाहा सिद्धार्थ जाधव व्हिडीओ
View this post on Instagram
आई- वडिलांना पाहिल्यावर सिद्धार्थ जाधव भावूक होतो. यावेळी सिद्धार्थ सांगतो की, माझे वडील दादर येथील प्लाझा थिएटर बाहेर पेपर टाकून झोपायचे…आज त्याच थिएटर समोर माझं घर आहे…याचा माझ्या वडिलांना खूप जास्त अभिमान वाटतो. यादरम्यान सिद्धार्थला त्याचे स्ट्रगलचे दिवस आठवले.
दे धिंगाणाच्या मंचावर सिद्धार्थला खास त्याच्या वाढदिवसानिमित्त हे सरप्राईज देण्यात आले. मात्र, आई- वडिलांना मंचावर पाहून आणि स्ट्रगलचे दिवस सांगताना सिद्धार्थला अश्रू रोखणे देखील अवघड झाले होते. हा पूर्ण भाग आपल्याला दे धिंगाणाच्या शनिवार आणि रविवार स्पेशल एपिसोडमध्ये बघता येणार आहे.