Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा’, ‘सोयरीक’ चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज!

ध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे.

‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा’, ‘सोयरीक’ चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज!
Ajay Gogawale
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 4:03 PM

मुंबई : सध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या आगामी ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला आहे.

‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा,  भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा, पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला,  तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला, आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा,  येल्लू आईचा उधं उधं…..’ असे बोल असणारा हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

गोंधळाबद्दल सांगताना अजय गोगावले म्हणतात…

गोंधळाबद्दल बोलताना अजय गोगावले सांगतात की, ‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. विजयसोबत याआधी काम केल्याने ‘मळवट’ या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमलं व हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘अदिती म्युझिक’ कंपनीने या गाण्याचे हक्क घेतले आहेत.

कशी आहे सोयरीकची कथा?

आपल्यातल्या स्वार्थ अन निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न ‘सोयरीक’ चित्रपटात करण्यात आला आहे. मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’ हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘इंडियन आयडल – मराठी’च्या परीक्षक पदाची धुरा अजय-अतुलच्या खांद्यावर!

सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे ‘इंडियन आयडल – मराठी’! कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंडियन आयडल – मराठी’ ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षणही संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत.

आपल्या संगीताचं गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे.

‘अजय-अतुल’ या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला ‘अजय-अतुल’ हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत.

हेही वाचा :

‘या’ प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाची नात झळकणार ‘सूर्यवंशी’ चित्रपटात, सर्वत्र आहे बोल्डनेसची चर्चा

लाल साडी अन् केसांत माळलाय गजरा…पारंपारिक साजात खुलून आलंय तेजस्विनी लोणारीचं सौंदर्य!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.