‘लोच्या झाला रे’ परदेशातही प्रदर्शित होणार, चित्रपटाची टीम सातासमुद्रापार धम्माल करणार

| Updated on: Feb 11, 2022 | 4:01 PM

प्रेक्षकांच्या मागणीनंतर आता 'लोच्या झाला रे' हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे. ‘लोच्या झाला रे’ यु.एस, यु.ए. ई.सह अन्य देशांमध्ये तीसहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोच्या झाला रे परदेशातही प्रदर्शित होणार, चित्रपटाची टीम सातासमुद्रापार धम्माल करणार
लोच्या झाला रे
Follow us on

आयेशा सय्यद, मुंबई : काही सिनेमे हे केवळ त्या सिनेमातील कलाकारांसाठीच पाहायचे असतात. त्या सिनेमातील कलाकारांचा कल्ला इतका मनोरंजक असतो की, सिनेमा पाहता पाहता त्या पडद्यावरील कल्ल्यात प्रेक्षकही सहभागी होऊन जातो. असाच एक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी दिग्दर्शित ‘लोच्या झाला रे(Lochya Zala Re) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांना खळखळून हसवले. अवघ्या महाराष्ट्रात असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami), विजय पाटकर (Vijay Patkar), प्रसाद खांडेकर (Prasad Khandekatr), रेशम टिपणीस (Resham Tipnis) आता परदेशातही लोच्या करायला जाणार आहेत. परदेशातील प्रेक्षकांच्या मागणीनंतर आता ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

आदी, मानव, डिंपल आणि काका यांच्यात चाललेला गोंधळ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता हा लोच्या नक्की कोणाच्या आयुष्यात होतोय, हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. धमाल मस्ती आणि प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. हा चित्रपट इतका हिट ठरला की, परदेशातही हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी परदेशातील मराठी प्रेक्षकांकडून होऊ लागली. त्यामुळे ‘लोच्या झाला रे’ यु.एस, यु.ए. ई.सह अन्य देशांमध्ये तीसहून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ही सगळी टीम परदेशातही कल्ला करणार आहे.

चित्रपटाच्या या यशाबद्दल दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, “महाराष्ट्रात प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता ‘लोच्या झाला रे’ परदेशवारी करणार आहे. आम्हाला अतिशय आनंद होतोय की, परदेशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे.” तर “हा चित्रपट प्रेक्षकाचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट परदेशात प्रदर्शित करण्याची मागणी होत आहे. या परदेशी प्रेक्षकांचा मान राखत आम्ही ‘लोच्या झाला रे’ तिथे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत आहोत. आम्हाला आशा आहे की, तेथील प्रेक्षक असेच भरभरून प्रेम देतील”, असं मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा यांनी म्हटलंय.

लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दी एन्टरटेन्मेंट कंपनी व अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मंगेश जगताप कार्यकारी निर्माता आहेत. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Vaidehi Parashurami : वैदेही परशुरामी झाली ‘गुलाबो’, Weekend mood मधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

Lock Up Show : कंगना रनौतच्या ‘लॉकअप’चा टीझर आऊट, ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अलिया म्हणते, ‘आम्ही लग्न केलंय’, खरचं लग्न झालय का ? जाणून घ्या