‘मी नि:शब्द झालोय’, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

"मी अतिशय भारावून गेलो आहे. त्यामुळे मी आणखी त्या गोष्टीचा बांधला गेलो आहे की, आपल्याला आणखी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचं आहे. त्यामुळे मी सिलेक्टेड काम करतोय. पण मी काम निश्चितच करत राहणार. माझे तुम्ही आहात आणि तुमचा मी आहे, मी तुमच्याशिवाय राहुच शकत नाही", अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

'मी नि:शब्द झालोय', महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 8:42 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा झाली आहे. यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अशोक सराफ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला पहिली प्रतिक्रिया दिली. “मला एवढ्या लवकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं किंवा मला माझं तेवढं काम वाटतही नव्हतं. मला महाराष्ट्र भूषण दिग्गजांच्या पंक्तिला नेऊन बसवलं त्यामुळे मी नि:शब्द झालोय. कारण ज्यांना पुरस्कार मिळाला ते थोर लोकं आहेत. त्यामुळे मी काहीतरी केलंय याची जाणीव मला व्हायला लागली आहे. तुम्ही मला ती जाणीव करुन दिली ते मी कधी विसरु शकणार नाही”, अशी भावनिक प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली. “मी अतिशय भारावून गेलो आहे. त्यामुळे मी आणखी त्या गोष्टीचा बांधला गेलो आहे की, आपल्याला आणखी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचं आहे. त्यामुळे मी सिलेक्टेड काम करतोय. पण मी काम निश्चितच करत राहणार. माझे तुम्ही आहात आणि तुमचा मी आहे, मी तुमच्याशिवाय राहुच शकत नाही. त्यामुळे काम करायलाच पाहिजे”, अशी देखील भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी पत्नी निवेदिता सराफ यांचीदेखील प्रतिक्रिया सांगितली. निवेदिता यांनाच सर्वात आधी याबाबत फोन आला. त्यामुळे त्या आनंदाने जोरात ओरडल्या असं अशोक सराफ म्हणाले. यावेळी त्यांनी निवेदिता सराफ यांचेदेखील आभार मानले. त्यांच्याशिवाय आपण काम करणं शक्य नव्हतं. त्यांची साथ पाठिशी खंबीरपणे होती त्यामुळे आपली जडणघडण होऊ शकली, असं प्रामाणिक मत अशोक सराफ यांनी मांडलं. यावेळी अशोक सराफ यांना तुमची आवडती भूमिका कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सुंदर उत्तर दिलं. “आपण आवडती भूमिका असं नाही ठरवत. यशस्वी झाली तर ती आवडती असं नाहीय. आवडत्या तर सर्वच भूमिका आहे. त्या आवडल्या म्हणूनच केल्या. मी आवडतील अशा रितीने देखील केल्या. त्यामुळे आवडती कोणती असं मी निश्चितपणे सांगू शकत नाही. प्रत्येक भूमिका ही आवडती आहे. प्रत्येक भूमिकेसाठी मी तेवढेच श्रम घेतले आहेत”, अशोक सराफ यांनी सांगितलं.

रंगभूमीवरचे आणि चित्रपटातले अशोक सराफ हे सेम की वेगवेगळे?

अशोक सराफ यांना यावेळी रंगभूमीवरचे आणि चित्रपटातले अशोक सराफ हे सेम की वेगवेगळे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी रंगभूमी आणि चित्रपट यांच्यातील फरक सांगितला. “त्यात थोडासा फरक आहे. वेगवेगळे तर आहेच. अभिनय काय असतो? अभिनय हा सगळीकडे सारखा, पण सादर करण्यात थोडं वेगळेपण असतं. ते बघायलाच पाहिजे. मी माझी नाटकाची सुरुवात ही जुन्या संगीत नाटकापासून केली होती. संगीत नाटक आणि आताचं नाटक याला जोडणारा मी एक दुवा आहे. संगीत नाटकापासून ते आताच्या नाटकापर्यंत मी काम करतोय”, असं अशोक सराफ म्हणाले.

“रंगभूमीवर असल्यानंतर एक वेगळी स्टाईल मला करावी लागली. कारण ते एक वेगळं प्लॅटफॉर्म आहे. तिथे थेट प्रेक्षकांसोबत नातं असतं. स्टेज 32 फुटाचं असतं. शेवटच्या प्रेक्षकापर्यंत आवाज पोहोचण्यापर्यंत जोराने बोलावं लागतं. पण सिनेमात तसं नाही. सिनेमात तुम्हाला कंट्रोल करावं लागतं. कॅमेऱ्या अवघ्या काही फुटांवर असतो. कॅमेरा तुमची बारीक बारीक एक्सप्रेशन कैद करत असतो. त्यामुळे तुम्हाला सादरीकरण करण्यासाठी काळजी घ्यावी लागते. नाटकमध्ये एकदाच पाठांतर करावी लागते. त्यामुळे तुम्हाला सलगता लागते. पण सिनेमात तसं नसतं. सिनेमात वेगवेगळे सीन करावे लागतात. दोन्ही कठीण आहेत. दोन्ही वेगवेगळ्या जबाबदारीने करावं लागतं. दोन्ही करणं हे वेगळेपण जमलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.