आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला! कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

‘बुर्रूम बुर्ऱुम’ म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. ‘पांडू’ (Pandu) चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला! कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
Pandu
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 12:09 PM

मुंबई : ‘बुर्रूम बुर्ऱुम’ म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. ‘पांडू’ (Pandu) चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे. विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार, अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर आज (24 नोव्हेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. येत्या 3 डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर :

दोन मित्रांची धमाल कथा!

‘पांडू’ या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की, या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते, तीही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा, तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा.

मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते.

चित्रपटाची गाणीही सुपरहिट!

‘पांडू’ हा चित्रपट पूर्णतः विनोदी अंगाने जाणारा असून, तो प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि त्यांचा ताण दूर करेल असा विश्वास झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांना वाटतो. अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत. ‘बुरुम बुरुम’ने 20 लाख व्ह्यूज, तर ‘केळेवाली’ गाण्याने अवघ्या 24 तासांत 10 लाख व्ह्यूज मिळवलेत. चित्रपटाचा हा ट्रेलरही पांडूबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करेल, अशी आशा चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली. येत्या 3 डिसेंबरला हा चित्रपट राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

Atrangi Re | सारा-धनुष-अक्षयचा ‘अतरंगी’ अंदाज, ‘अंतरंगी रे’चे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!

Ratris Khel Chale 3 | ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये ‘शेवंता’ बदलणार! अपूर्व नेमळेकरने मालिकेतून घेतली एक्झिट!

निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नेमकं काय घडलं ?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.