Subodh Bhave सांगणार चित्रपटसृष्टीतील रंजक कथा; ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे’ची उत्सुकता

गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या 'सुहाना सफर विथ अनु कपूर' या शोला देशभरातील लाखो चाहत्यांचं प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला. त्यानंतर आता बिग एफएम (BIG FM) आणखी एक भन्नाट शो घेऊन आला आहे.

Subodh Bhave सांगणार चित्रपटसृष्टीतील रंजक कथा; 'बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे'ची उत्सुकता
Subodh BhaveImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 4:25 PM

गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या ‘सुहाना सफर विथ अनु कपूर’ या शोला देशभरातील लाखो चाहत्यांचं प्रचंड प्रेम आणि पाठिंबा मिळाला. त्यानंतर आता बिग एफएम (BIG FM) आणखी एक भन्नाट शो घेऊन आला आहे. मराठी श्रोत्यांसाठी यापूर्वीच्या यशस्वी शोच्या संकल्पनेवर आधारित बीग एफएम ‘बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे(Big Marathi Bioscope with Subodh Bhave) हा शो सादर करत आहे. ज्यामध्ये भारतीय अभिनेत्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. सोमवार ते शनिवार पुण्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात नागपूर व मुंबई वगळता रोज संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत हा शो प्रसारीत केला जाणार आहे. नागपूर आणि गोव्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी ७ ते ८ हा शो प्रसारित होईल. तसंच मुंबईमध्ये दर रविवारी ५ ते ६ या वेळेत हा शो प्रसारित होईल. (Radio Show)

या शोमध्ये सुबोध भावे हे सेलिब्रिटी पाहुण्यांशी संवाद साधतील. देशातील सर्वात जुन्या चित्रपट उद्योगाच्या वारशाची, दिग्गज अभिनेत्यांच्या रंजक गोष्टी, याआधी कधीही न ऐकलेल्या बाबी यावर हा संवाद साधला जाईल. या शोमध्ये लोकप्रिय भारतीय अभिनेते, लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक यांचा समावेश असेल जे मराठी चित्रपट, थिएटर आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. ते केवळ मराठी चित्रपटाच्या कथाच सांगणार नाहीत तर त्यांचा दृष्टीकोनदेखील मांडतील. या कथा इंटरनेटवर सहज उपलब्ध नसलेल्या व अस्सल संशोधनावर आधारित असतील.

सुबोधची इन्स्टा पोस्ट

बिग एफएमचे चीफ ब्रँड आणि डिजिटल ऑफिसर सुनील कुमारन या शोबद्दल म्हणाले, “आपल्या प्रतिभावान कलाकारांच्या प्रयत्नांमुळे मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दशकांपासून जगभरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या कलाकारांचा प्रत्येक चित्रपट हा चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारा आहे. ज्यांनी या क्षेत्रात काम केले आहे त्यांच्याकडे चाहत्यांना सांगण्यासाठी आणि प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी असंख्य कथा आहेत. या कधीही समोर आल्या नाहीत. मला विश्वास आहे की, सुबोधसारख्या प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाच्या मदतीने आम्ही प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच प्रेरणा आणि माहितीने परिपूर्ण असलेला कार्यक्रम उपलब्ध करून देऊ.”

शोबद्दल सुबोध भावे म्हणाला, “रेडिओ होस्ट म्हणून हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांवर प्रकाशझोत टाकणारा शो करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हा शो आणि बिग एफएम हे अद्भुत व्यासपीठ आहे. या कथांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनदेखील यातून व्यक्त होईल.”

हेही वाचा:

Tu Tevha Tashi: अभिनयावरील प्रेमापोटी सोडली नोकरी; रिॲलिटी शोमध्येही कमावलं नाव

शाहरुख, सलमान, सैफ, अक्षयने सौदी अरबच्या मंत्र्यांची घेतली भेट; नेमकं काय आहे कारण?

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...