‘तू लय बदललीस गं गंगे…’, अभिनेत्री राजश्री लांडगेसाठी चित्रा वाघ यांची खास पोस्ट
गाढवाचं लग्न या चित्रपटातील गंगी म्हणजेचं अभिनेत्री राजश्री लांडगे आणि चित्रा वाघ यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर सुंदर कॅप्शन देत चित्रा वाघ यांनी एक फोटो शेअर केला आहे. (BJP Leader Chitra Wagh's special post for actress Rajshree Landage)
मुंबई : अनेकदा कळत नकळत आपली आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत भेट होते. ही भेट म्हणजे आपल्यासाठी एक सुखद धक्काच असतो. असंच काही आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यासोबत घडलं आहे. गाढवाचं लग्न (Gadhvache lagna) या चित्रपटातील गंगी म्हणजेचं अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajashree Landge) आणि चित्रा वाघ यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर सुंदर कॅप्शन देत चित्रा वाघ यांनी एक फोटो शेअर केला आहे.
‘तू लय बदललीस गं गंगे…’
चित्रा वाघ यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तू लय बदललीस गं गंगे…गाढवाचं लग्न या चित्रपटातील गंगी म्हणजेचं माझी मैत्रिण राजश्री लांडगे हिची जवळपास 2 वर्षांनी अचानक सुखदं भेट नाशिकमध्ये. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षक आवडीनं पाहतात आणि खळखळून हसतातही….खुप शुभेच्छा “गंगी” तुला पुढील वाटचालीस ? #गोडगंगी’ सोबतच एक सुंदर फोटोसुद्धा शेअर केला आहे.
‘गाढवाचं लग्न’ चित्रपटातील गंगीचा चित्रपटांमधील प्रवास
‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटामधील ‘गंगी’ला आजही लोक विसरलेले नाहीत. या चित्रपटात ‘गंगी’ ही व्यक्तिरेखा साकारली होती अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajashree Landge) यांनी. आपल्या करिअरच्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरेसोबत प्रमुख भूमिकेत त्यांना काम करता आलं, या संधीचे सोनं करत आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात तिने एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘गाढवाचं लग्न’ हा चित्रपट सुपरहिट झाला, पण ‘गंगी’ मात्र नंतर चित्रपटातक्षेत्रात फारशी दिसली नाही. ‘गंगी’ या व्यक्तिरेखेसाठी तिची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा छान गावरान पद्धतीचा होता. राजश्रीने या व्यक्तिरेखेचा लहेजा एवढा उत्तम पकडला, की तिच्या या भूमिकेसाठी सगळ्यांकडूनच खूप कौतुक झालं. चित्रपटात गावरान भूमिका केली असली, तरी राजश्रीला खऱ्या आयुष्यात मॉडर्न राहायला आवडतं.
‘सिटीझन’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीबरोबरच निर्माता म्हणून पदार्पण
चित्रपट सृष्टीपासून काही काळ दूर राहिलेल्या राजश्रीने ‘सिटीझन’ या चित्रपटाद्वारे अभिनेत्रीबरोबरच निर्माता म्हणून पदार्पण करत, चित्रपटाची कथा आणि वेशभूषासुध्दा सांभाळली होती. तिच्या कारकिर्दीची आणि सामाजिक कार्याची दखल घेत तिला ‘भारत गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. राजश्रीने ‘सिटीझन’ चित्रपटात प्रमुख भूमिका देखील साकारली होती. ती या चित्रपटात ग्लॅमरस भूमिकेत दिसली होती.
राजश्री लांडगेच जन्म पुण्यात झाला. तिला अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती, पण तिला लहांपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाचे स्वप्न घेऊन तिने मुंबई गाठली. सुरुवातीला तिने काही नाटकांमध्ये देखील काम केले. मात्र, ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली.
संबंधित बातम्या
Amruta Khanvilkar : लेडी बॉस अमृता खानविलकरचं नवं फोटोशूट, पाहा खास फोटो
Video | ‘गं कुणी तरी येणार येणार गं’, ‘मम्मी’ फेम अभिनेत्री स्मिता तांबेकडे ‘गोड बातमी’!