मराठी कलाकारांच्या आंदोलनाला भाजपचे समर्थन, आशिष शेलारांचा थेट सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन
लाँकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या मराठी कलावंतांनी आज ठाकरे सरकारविरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले.
मुंबई : लाँकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या मराठी कलावंतांनी आज ठाकरे सरकारविरोधात राज्यभर आंदोलन केले. यातील एक आंदोलन आज दादर हिंदमाता येथे दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले. आम्हाला आमचे म्हणणे सरकार पुढे मांडू द्या, अशी विनंती हे कलावंत सरकारकडे करीत होते. पण सरकारकडून चर्चेला वेळ मिळत नव्हती. अखेर या कलाकारांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन ठिय्या मांडला. (BJP’s support to protest of Marathi artists, Ashish Shelar call directly to Amit Deshmukh)
याबाबतचे वृत्त समजताच भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. सोबत स्थानिक आमदार कालिदास कोळबंकरदेखील होते. त्यांनी अभिनेते विजय पाटकर आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.
आम्हाला आमचे म्हणणे सरकारकडे मांडायचे आहे. किमान आमचे ऐकून घेण्यासाठी वेळ तरी द्या, अशी विनंती हे कलावंत करीत होते, पण सरकार कडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जोपर्यंत वेळ मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा कलावंतांनी घेतला होता. त्यामुळे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी तातडीने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि उद्या दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात चर्चेसाठीची वेळ मिळवून दिली.
दरम्यान, मराठी कलावंतांची अशी उपेक्षा योग्य नाही, अशा शब्दांत आमदार अॅड आशिष शेलार यांनी खंत व्यक्त केली.
मराठी कलावंतांनी मागण्यांसाठी ठाकरे सरकार विरोधात आंदोलन केले. सरकारशी चर्चेची वेळ मिळावी म्हणून भोईवाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मारला, पण कोणी दाद देईनात. भोईवाडा येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्र्यांशी बोलणे करुन उद्याची वेळ मिळवून दिली. मराठी कलावंतांची अशी उपेक्षा योग्य नाही! pic.twitter.com/ZGOTvRMcrz
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2021
इतर बातम्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘या’ निर्णयाचं मनसेकडून पहिल्यांदाच जाहीर स्वागत; काय आहे मनसेचं ट्विट?
(BJP’s support to protest of Marathi artists, Ashish Shelar call directly to Amit Deshmukh)