अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हळहळले

"रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे", अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला.

अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हळहळले
अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हळहळले
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 9:00 PM

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. अतुल परचुरे यांचे अकाली निधन हे वेदनादायी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हळहळले आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एग्झिट झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. “रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली दैदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं.

हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील अतुर परचुरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “मराठी रंगभूमीसह मालिका-चित्रपट आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनानं एक प्रतिभावंत, हरहुन्नरी कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचं निधन ही मराठी कला विश्वाची खूप मोठी हानी आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा चाहता वर्ग बनवला होता. विनोदी कलाकार म्हणून देखील त्यांनी आपली छाप पाडली. अतुल परचुरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे हळहळले

अतुल परचुरे यांच्या निधननंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे यांनीदेखील भावूक पोस्ट शेअर दु:ख व्यक्त केलं आहे. “प्रिय अतुल खरं खरं सांग आयुष्याच्या रंगमंचावरून अशी धक्कादायक एक्झिट घेताना तुझ्यावर, तुझ्या नाटकांवर अलोट प्रेम करणाऱ्या, अनेकानेक भूमिकांचा आनंद घेणाऱ्या रसिकांची तू काहीच पर्वा केली नाहीस. चटका लावून निघून गेलास. तुझ्या गालावरची गोड खळी आणि प्रसन्न हास्याने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारा अतुल परचुरे नावाचा अभिनेता आमच्यात नाही, हे वास्तव स्वीकारणे जड आहे. वेदना देणारे आहे”, असं बावनकुळे म्हणाले.

“तुझ्या मराठी मालिका, नाटके आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरोशावर तू जीवघेण्या आजारावर मात केलीस आणि ‘खरं खरं सांग..’ या नाटकातून तू पुन्हा रंगमंचावर दमदार एंट्री केली. तुझ्यातला अभिनेता सगळ्यांनी अनुभविला आणि सायंकाळी ही बातमी खूप धक्का देवून गेली. माझी विनम्र श्रद्धांजली..!!”, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे हळहळले.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.