Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. आज नागपूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Rajesh Pinjani |  राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा
rajesh pinjani
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 10:18 AM

मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असताचा आता कला विश्वामधून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचं काल अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.   ते पुण्याला राहात होते पण त्यांच्या मुळ गावी नागपूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कलाविश्वाकडून हळहळ व्यक्त

‘बाबू बँड बाजा” सारख्या चित्रपटामधून समाजाचे वास्तविक दर्शन दाखवणाऱ्या दिग्दर्शकच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व हळहळ व्यक्त करत आहे. अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजानी हे तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शनमुळे myocardial infarction हृदयविकाराचा झटका आपल्यासोबत नाहीत ही दुःखद घटना. अतिशय जड अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 ही होती राजेश पिंजाणी यांची शेवटची पोस्ट

राजेश पिंजाणी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 2021 या वर्षाला निरोप देत 2022 च्या स्वागताची पोस्ट केली होती. त्याला Good Bye & Welcome……!!!! ❤️ असे कॅप्शन देखाल देण्यात आले होते. ही पोस्ट अभिनेता, गायक किशोर सौमित्र यांनी पोस्ट केली होती. त्यापोस्ट ची सुरवात  “आज विजू माने या माझ्या मित्राची त्याच्या ” पांडू ” या हिट सिनेमा बद्दलची एक पोस्ट वाचली आणि आम्हा सगळ्याच कलावंताच्या नशिबी एकसारखे भोग का यावेत हा प्रश्न पडला .. म्हणून …, “अशी करण्यात आली होती.

राजेश पिंजाणीचे काम :

‘बाबू बँड बाजा’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पिंजाणी यांनी बाजू बॅंड बाजाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. या चित्रपटात एका बॅन्डवाल्याचे आयुष्य नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा आरसाच आपल्याला पाहायला मिळाला. या चित्रपटासाठी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

संबंधीत बातम्या :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी..
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले....
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.