Fact Check : लतादीदींनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत की त्यांच्याकडे कुणी गाणं घेऊन गेलं नाही? काय वास्तव?

खरंच लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणी गायली नव्हती की होती? याची चिकित्सा होणंही गरजेचंय. याचीच पडताळणी करण्याचा प्रयत्न टीव्ही 9 मराठीनं केलाय. शाहीर संभाजी भगत यांच्याशी याबाबत आम्ही संवाद साधला. यावेळी संभाजी भगत त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत.

Fact Check : लतादीदींनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत की त्यांच्याकडे कुणी गाणं घेऊन गेलं नाही? काय वास्तव?
लता मंगेशकर यांनी खरंच आंबेडकरी गाणी गायली की नाही?
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 12:40 PM

मुंबई : लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिलं. 6 फेब्रुवारीला लता मंगेशकरांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. पत्रकारांच्या प्रश्नाला सोमवारी (7 फेब्रुवारी, 2022) त्यांनी उत्तर दिलं. लता मंगेशकर (Lata Mangeshakr) यांनी आंबेडकरी गाणी (Ambedkari Songs) गायली की नाही, याबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारणा करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी म्हटलं की, या प्रश्नावर लता मंगेशकर जिवंत असताना उत्तर दिलं असतं. ‘लता मंगेशकर यांनी जशी आंबेडकरी गाणी गायली नाही, तशीच त्यांनी नेहरु आणि सरदार पटेलांचीही गायली नाही’, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं. पण खरंच लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणी गायली नव्हती की होती? याची चिकित्सा होणंही गरजेचंय. याचीच पडताळणी करण्याचा प्रयत्न टीव्ही 9 मराठीनं केलाय. लोकशाहीर संभाजी भगत (Shahir Sambhaji Bhagat) यांच्याशी याबाबत आम्ही संवाद साधला.

यावेळी लोकशाहीर संभाजी भगत त्यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. लता मंगेशकर जिवंत असताना लोकशाहीर संभाजी भगत यांनी अनेकदा त्यांच्यावर टीका केली. थेट कार्यक्रमात व्यासपिठावरुन टीका लोकशाहीर संभाजी भगत यांनी केली होती. याबाबतचे अनेक व्हिडीओही युट्युब, फेसबुकवर उपलब्ध आहेत. त्यामुळेच आता लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर लोकशाहीर संभाजी भगत यांच्याकडे याबाबत विचारणा TV9 मराठीनं केली.

काय म्हणाले संभाजी भगत?

लोकशाहीर संभाजी भगत यांनी टीव्ही 9 मराठी बोलताना स्पष्ट शब्दांत आपलं म्हणणं व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलंय की,…

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल मी दुःख व्यक्त करतो. त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि एक स्त्री म्हणून त्यांच्याबाबत माझ्या मनात संवेदना आहे. पण त्यांच्यासोबत असलेले माझे वैचारीक मतभेद हे जसे होते, तसेच आजही आहेत. जसा त्यांना त्याचे विचार ठेवण्याचा अधिकार आहे, तसेच त्याचे विचार नाकारण्याचाही मला अधिकार आहे. त्यांच्या मृ्त्यूमुळे वैचारीक मतभेत ते दूर झाले, असं होत नाही. लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणी गावीत, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेकांनी त्यांना विचारणा केली. पण लता मंगेशकर यांनी नकार दिला. लता मंगेशकर यांनी एकही आंबेडकरी गाणं गायलेलं नाही, हे सत्य आहे. नंतरच्या काळात एक दरीच निर्माण झाली, त्यामुळे नंतरच्या काळात त्यांना आंबेडकरी गाण्यासाठी किती विचारणा झाली असेल, हे सांगणं अवघड आहे.

लोकशाहीर संभाजी भगत यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल माणूस म्हणून त्याच्याप्रती आपली संवेदना असल्याचं म्हटलंय. पण, वैचारीक मुद्द्यांवर मात्र तडजोड होऊ शकत नाही, असंही त्यांनी ठामपणे म्हटलंय.

जर गाणं गायलं असतं तर..?

लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणं गायलंच नाही, असं प्रथमदर्शनी लोकशाहीर संभाजी भगत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होतं. मात्र याचवेळी लोकशाहीर संभाजी भगत यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. जरी लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणी गायली असती, तरीही त्यांच्याबाबतचे वैचारीक मतभेद मिटले असते, असंही झालं नसतं. त्यामुळे त्यांनी आंबेडकरी गाणी जरी गायली असती तरिही फार काही विशेष फरक पडला नसता, असंही लोकशाहीर संभाजी भगत यांनी पुढे म्हटलंय.

काय आहेत वैचारीक मतभेद?

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवेळी लता मंगेशकर यांनी घेतलेल्या आणि न घेतलेल्या भूमिका या शंकास्पद होत्या, असाही संशय काही जणांकडून घेतला जातो. नरेंद्र मोदी यांना भाऊ मानण्यापासून ते भाजपबाबत थेट राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार जसा लता मंगेशकर यांना आहे, तराच त्यांची भूमिका नाकारण्याचाही अधिक आपल्याला संविधानानं दिलेला आहे, असंही संभाजी भगत यांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या नंतर वैचारीक वादाला वेगळे रंग लावणं चुकीचं असल्याचंही मत संभाजी भगत यांनी व्यक्त केलं आहे.

लता मंगेशकरांनी घेतलेल्या भूमिकांबाबत आदर ठेवून त्याला विरोध करण्याचा आपला अधिकार घटनेनं दिल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे त्याच्या मृत्यूनं व्यथित होत, त्याच्या मृत्यूबाबतही आपण संवेदनशील आहोत, असंही ते म्हणालेत. मात्र ज्या छावणीचे लता मंगेशकर यांनी विचार स्वीकारले, त्या छावणीचा मी नाही, असंही त्यांनी म्हटलंय. लता मंगेशकर यांनी शोषित, वंचित, गरिबांचा विचार मांडल्याचं कधीही दिसलं नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

पडताळणीत काय समोर?

गुगलवर लता मंगेशकर यांची आंबेडकरी गाणी शोधण्याचा प्रयत्न केला असता, तिथे तर एकही गाणं दिसून आलेलं नाही. दरम्यान, लोकशाहीर संभाजी भगत यांनी दिलेल्या माहितीनुसारही लता मंगेशकर यांनी आंबेडकरी गाणी गाणं नाकारलं आणि नंतरच्या काळातही त्यांनी एकही आंबेडकरी गाणं गायलेलं नाही, अशी माहितीही समोर आली.

कोण आहेत संभाजी भगत?

संभाजी भगत हे लोकशाहीर असून गेली अनेक वर्ष ते आपल्या शाहिरीतून प्रबोधनाचं काम करत आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून शाहीर संभाजी भगत यांनी आंबेडकरी विचार पोहोचवण्याचं, रुजण्याचं काम केलंय. त्यांचे अनेक व्हिडीओ युट्युबवरही उपलब्ध आहेत. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोर्ट या सिनेमाचे संभाजी भगत हे संगीत दिग्दर्शक होते.

लोकशाहीर भगत यांचा लता मंगेशकरांवर टीका करतानाचा 2015 सालचा तो Video

Video सौजन्य – Ulgulan

संबंधित बातम्या :

सुरांची श्रीमंती तर होत्याच, पण दीदी तितक्याच वैभवसंपन्नही होत्या! लता मंगेशकरांची प्रॉपर्टी माहितीये का कितीये?

कोण होता ‘तो’ व्यक्ती, जो एक गाणं ऐकण्यासाठी रोज लता मंगेशकरांना फोन करायचा! वाचा किस्सा

लता मंगेशकर यांच्याबाबतचे यादगार किस्से वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.