Timepass 3: ‘साई तुझं लेकरू’, ‘टाइमपास ३’मधील पहिलं धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच प्रेक्षकांनी 'टाइमपास' चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये पाहिलं आहे. दगडूचं हेच साईप्रेम 'टाइमपास 3'मध्येही पाहायला मिळणार आहे.

Timepass 3: 'साई तुझं लेकरू', 'टाइमपास ३'मधील पहिलं धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
'टाइमपास ३'मधील पहिलं धम्माल गाणं प्रेक्षकांच्या भेटीलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 4:13 PM

आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू (Prathamesh Parab) साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच प्रेक्षकांनी ‘टाइमपास’ चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांमध्ये पाहिलं आहे. दगडूचं हेच साईप्रेम ‘टाइमपास 3’मध्येही (Timepass 3) पाहायला मिळणार आहे. ‘साई तुझं लेकरू’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून साईच्या चरणी दगडूचं कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत. या गाण्यात भाऊ कदम (Bhau Kadam) म्हणजेच दगडूचे वडील साईबाबांसमोर आभार मानत, दगडू तुमचाच लेकरू असल्याचं सांगत आहेत. दगडूवर तुमची कृपा कायम अशीच राहू दे, असंही ते सांगत आहेत.

हे गाणं भाऊ कदम, प्रथमेश परब, आरती वडगबाळकर, मनमीत पेम, ओंकार राऊत आणि जयेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आलं असून या गाण्याला अमितराज आणि आदर्श शिंदे यांचा भारदस्त आवाज लाभला आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या या गाण्याला अमितराज यांनीच संगीतबद्धही केले आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार यांचं नृत्यदिग्दर्शन आहे.

पहा व्हिडीओ-

यापूर्वीही पहिल्या आणि दुसऱ्या भागातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. ‘टाइमपास ३’मधील गाणीही प्रेक्षकांच्या ओठांवर अशीच रुळतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सची निर्मिती असलेल्या ‘टाइमपास 3’चं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं असून यात दगडूच्या आयुष्यात आलेली ‘पालवी’ पाहायला मिळणार आहे. या पालवीची भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. ‘टाइमपास 3’ हा चित्रपट येत्या 29 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा

2014 मध्ये ‘टाईमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरने यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारल्या. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधवनेच केलं होतं. आता ‘टाईमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळतेय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.