मराठी चित्रपटातून जिनिलिया मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार, रितेश देशमुख सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!

सिनेमाच्या मोठ्या पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D’Souza-Deshmukh) यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे. मोठ्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

मराठी चित्रपटातून जिनिलिया मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार, रितेश देशमुख सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा!
Ved : Marathi Movie
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:12 PM

मुंबई : सिनेमाच्या मोठ्या पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D’Souza-Deshmukh) यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे. मोठ्या पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. दोघेही अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाचे नाव जोडले गेले आहे, परंतु यावेळी दोघांच्या भूमिका थोड्या वेगळ्या असणार आहेत.

‘वेड’ या मराठी चित्रपटातून रितेश दिग्दर्शनात पदार्पण करणार असून, त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया या चित्रपटाची नायिका असणार आहे. मोठ्या ब्रेकनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

सोशल मीडियावर केली चित्रपटाची घोषणा!

रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, ’20 वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर मी पहिल्यांदाच त्याच्या मागे उभे राहण्यास तयार झालो आहे. मी माझा पहिला मराठी चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे, मी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो आहे. या प्रवासाचा एक भाग व्हा, या वेडाचा भाग व्हा.’

पाहा पोस्ट :

या चित्रपटात दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाचीही कमान सांभाळणार आहे. रितेशने स्वतः सांगितले आहे की, ‘वेड’ म्हणजे वेडेपणा. यासोबतच त्याने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट मुंबई फिल्म कंपनी सादर करणार आहे. चित्रपटात दिग्दर्शनासोबतच रितेश अभिनयाची जबाबदारीही सांभाळणार आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री जिया शंकर देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. पती-पत्नीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आधीच उत्सुक आहेत.

नव्या वर्षात चित्रपट प्रदर्शित होणार!

हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हिट चित्रपट देणारी जिनिलिया ‘वेड’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. जिनिलिया शेवट 2020 मध्ये अनीस बज्मी यांच्या ‘इट्स माय लाईफ’मध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता हरमन बावेजा दिसला होता.

रितेश-जिनिलियाच्या नव्या चित्रपटाचे संगीत अजय-अतुलने दिले आहे. हा चित्रपट 12 ऑगस्ट 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता रितेश आणि जेनेलियाची जोडी काय कमाल करू शकते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून जिनिलिया-रितेशच्या करिअरला सुरुवात!

रितेश आणि जिनिलिया 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना भेटले होते. विशेष म्हणजे या चित्रपटातून दोघांनीही आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. वर्षभरानंतर दोघेही ‘मस्ती’ चित्रपटात एकत्र दिसले आणि त्यानंतर त्यांनी दीर्घ ब्रेक घेतला. 2012 मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात ही जोडी पाहायला मिळाली. त्याच वर्षी जिनिलिया आणि रितेशचे लग्नही झाले.

नव्या चित्रपटांविषयी बोलयाचे तर, रितेश लवकरच ‘प्लॅन ए प्लान बी’ या चित्रपटात दिसणार आहे . शशांक घोष दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. तसेच तो ‘काकुडा’मध्ये सोनाक्षी सिन्हासोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला ‘आर्याचा’ थरारक प्रवास

Happy Birthday Shatrughan Sinha | …जेव्हा होणाऱ्या सासूने शत्रुघ्न सिन्हांसोबत लेकीचं लग्न लावण्यास नकार दिला!

‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.