Ghor Andhari Re : उत्सव नवरात्रीचा, गायिका ‘योगिता बोराटे’ यांचं नवरात्रोत्सवा निमित्त खास गुजराती गाणं रिलीज

गायिका 'योगिता बोराटे' या गेली 25 वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका आहेत. तर त्यांची 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमी देखिल आहे. (Ghor Andhari Re: Special Gujarati song release on the occasion of Navratri, by singer 'Yogita Borate')

Ghor Andhari Re : उत्सव नवरात्रीचा, गायिका 'योगिता बोराटे' यांचं नवरात्रोत्सवा निमित्त खास गुजराती गाणं रिलीज
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 12:18 PM

मुंबई : प्रसिद्ध गायिका योगिता बोराटे (Yogita Borate) यांनी नवरात्रीचे (Navratri) औचित्य साधत ‘घोर अंधारी रे’ (Ghor Andhari Re) हे खास गुजराती गाणे रिलीज केलं. या गाण्यात पारंपारिक गरबा सादर करण्यात आला आहे. तसेच योगिता बोराटे यांनी हे गाणं गायलं असून ‘योगेश रायरिकर’ (Yogesh Rayrikar) यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर प्रिती संपत यांच्या नृत्यम डान्स अकॅडमीतील दोघांनी नृत्याविष्कार सादर केला आहे.

गायिका ‘योगिता बोराटे’ या गेली 25 वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत

गायिका ‘योगिता बोराटे’ या गेली 25 वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्या ‘स्वरमेघा क्रिएशन्सच्या’ संस्थापिका आहेत. तर त्यांची ‘स्वरमेघा म्युझिक’ अकॅडमी देखिल आहे. ‘स्वरमेघा क्रिएशन्सच्या’ अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची ‘दिल लगी ये तेरी’ आणि ‘हम हात जोडे दोनो’ ही ओरिजनल हिंदी गाणी प्रसिद्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये त्यांनी 2 ते 3 महिने संगीत कार्यक्रम केलेले आहेत.

योगिता बोराटे ‘घोर अंधारी रे’ या गुजराती गाण्याविषयी म्हणाल्या…

गायिका योगिता बोराटे ‘घोर अंधारी रे’ या गुजराती गाण्याविषयी म्हणतात, ”मी मुळची बडोद्याची असल्यामुळे मी नवरात्री हा सण फार जवळून पाहिला आहे. तेथील गरबा प्रेक्षणीय आणि श्रवणीय असतो. जितकी गर्दी गरबा खेळण्यासाठी असते तितकीच गर्दी ती गरब्यातील गाणी ऐकण्यासाठी असते. आणि आजही बडोद्यात अजूनही असाच गरबा अनुभवायला मिळतो. माझा संगितकार मित्र योगेश रायरिकर तोही बडोद्याचाच आहे. तर आम्ही दोघांनी मिळून हे गाणं करायचं ठरवलं.”

पाहा गाणं

पुढे योगिता, या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानचा किस्सा सांगतात, ”अवघ्या १० दिवसांत बनवलेलं हे माझं पहिलचं गाणं आहे. खरंतर कोणत्याही गाण्याच्या प्रोसेसिंगला फार वेळ लागतो. रेकॉर्डींग पासून ते चित्रीकरणापर्यंत ब-याच गोष्टी असतात. संपूर्ण गाण्याचं प्रोसेसिंग सुरू असताना अनेक अडचणी आल्या, हातात वेळही कमी होता. परंतु अंबामातेच्या कृपेमुळे हे गाणं पूर्ण होऊ शकले. या गाण्याची प्रोग्रामींग आणि मिक्सींग सुरतला झाली, या गाण्याचं लाईव्ह रिदम बडोद्याला झालं, तर ऑडीओ मुंबईतील आजीवासन स्टुडिओत झाला. एक गाणं इतक्या ठिकाणी ट्रॅव्हल करत ते आज देवी मातेच्या आशीर्वादाने रिलीज झालं. या गाण्यात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली. त्या सर्वांचे मी ऋणी आहे.”

संबंधित बातम्या

Akshara Singh : भोजपुरी क्विन अक्षरा सिंहने टेलिफोन बूथमध्ये दाखवला ग्लॅमरस अवतार, चाहते म्हणाले – ‘एकदम कडक’

KBC 13 | ‘तो’ व्हिडीओ पाहिला अन् बिग बींसमोरच जिनिलियाला कोसळलं रडू, पाहा ‘KBC 13’च्या मंचावर नेमकं काय घडलं…

Sharad Kelkar Net Worth : कधीकाळी करायचा चोर बाजारातून खरेदी, आता कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे शरद केळकर!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.